सोमवारपासून आणखी काही निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:06 AM2021-07-03T04:06:52+5:302021-07-03T04:06:52+5:30
रेस्टाॅरंटमध्ये दुपारी चारनंतर पार्सल मिळणार नाही, केवळ ऑनलाईन सेवा, सायंकाळी खेळणेही बंद लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शनिवार आणि ...
रेस्टाॅरंटमध्ये दुपारी चारनंतर पार्सल मिळणार नाही, केवळ ऑनलाईन सेवा, सायंकाळी खेळणेही बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शनिवार आणि रविवारी नागपुरात केवळ अत्यावश्यक सेवा देणारी दुकानेच सुरू राहतील. उर्वरित सर्व दुकाने बंद राहतील. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने ५ ते १२ जुलैपर्यंत नवीन आदेश जारी केले आहेत. यात आणखी काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
डेल्टा प्लस वेरियंटच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गेल्या सोमवारपासून संपूर्ण राज्यात लेव्हल ३ अंतर्गत निर्बंध लागू केले आहेत. याअंतर्गत दुकाने रात्री आठ वाजता ऐवजी आता दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. या आदेशाअंतर्गत शनिवार आणि रविवारी केवळ अत्यावश्यक सेवा (औषधी, किराणा, आदी) ची दुकाने सोडून सर्व दुकाने बंद राहतील. दुसरीकडे जिल्हा प्रशासनातर्फे पुढील आठवड्यासाठी जारी केलेल्या आदेशानुसार सायंकाळी खेेळण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रकारे पहाटे पाच ते सकाळी नऊपर्यंत खेळता येईल. त्याचप्रकारे पुढील आठवड्यात दुपारी चारनंतर रेस्टाॅरंटमधून पार्सल घेता येणार नाही. ऑनलाईन (डिलिवरी) सुविधा मात्र सुरू राहील.
शाळा-महाविद्यालये बंदच राहणार
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात ५ ते १२ जुलैपर्यंत शाळा-महाविद्यालयात शिकविता येणार नाही. व्यवस्थापनाचे कार्य, ऑनलाईन वर्ग सुरू राहतील. कोचिंग क्लासेसही बंद राहतील. मॉल-चित्रपटगृह, नाट्यगृह, स्वीमिंग पूल बंदच राहतील. मनपा प्रशासनातर्फेसुद्धा शनिवारी यासंदर्भातील आदेश जारी केले जातील. त्यांचे आदेशसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणेच राहतील, असे सांगितले जात आहे.