कधी ‘डोस’ तर कधी ‘सिरींज’चा तुटवडा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:12 AM2021-08-27T04:12:03+5:302021-08-27T04:12:03+5:30

उमरेड : जिल्ह्यात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये अव्वल असलेल्या उमरेड तालुक्यात कधी ‘डोस’ तर कधी ‘सिरींज’चा तुटवडा लसीकरणासाठी अडथळा निर्माण ...

Sometimes a shortage of doses and sometimes a shortage of syringes! | कधी ‘डोस’ तर कधी ‘सिरींज’चा तुटवडा !

कधी ‘डोस’ तर कधी ‘सिरींज’चा तुटवडा !

Next

उमरेड : जिल्ह्यात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये अव्वल असलेल्या उमरेड तालुक्यात कधी ‘डोस’ तर कधी ‘सिरींज’चा तुटवडा लसीकरणासाठी अडथळा निर्माण करीत आहे. मागील दोन दिवसांपासून डोस संपल्याने लसीकरण थांबल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे डेल्टा प्लसचा सामना उमरेड तालुका कसा करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

उमरेड कोविड सेंटरमध्ये लसीकरणासाठी दोन चमू नियुक्त करण्यात आल्या आहेत. नागरिकांचाही लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मात्र डोस उपलब्ध नसल्याने नागरिकांची निराशा होत आहे.

तालुक्यात पाचगाव, मकरधोकडा, बेला आणि सिर्सी प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून नूतन आदर्श महाविद्यालयातील क्रीडा संकुलात लसीकरण उपलब्ध आहे. आजमितीस शहरात २४,९३७ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून ९,६२५ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. आतापर्यंत एकूण ३४,५६२ जणांचे लसीकरण आटोपले आहे.

ऑगस्टमध्ये शहरासाठी सुमारे एक हजार डोसचा पुरवठा करण्यात आला होता. डोस उपलब्ध झाले असले तरी त्यासोबत एकही सिरींज (इंजेक्शन) पाठविण्यात आले नाही. अशावेळी मोठी कसरत करीत अन्य सिरींजचा वापर केला गेला. त्या सुद्धा संपल्या. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे वारंवार याबाबतची मागणी केल्यानंतरही पुरवठा केला जात नाही, असा आरोप होत आहे. लसीकरणासाठी चमू उपलब्ध आहे. नागरिकही लस घेण्यासाठी सज्ज आहेत. अशावेळी डोस आणि सिरींजचा तुटवडा निर्माण होणे, ही खेदाची बाब आहे.

---

पाचगावात अधिक पुरवठा

उमरेड तालुक्यात पाचगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या केंद्रामध्ये नरसाळा, हुडकेश्वर आणि काही भाग बहादुरा परिसरातील येतो. यामुळे एक लाखापेक्षाही अधिक लोकसंख्या या केंद्रांतर्गत मोडते. याकारणाने येथे उमरेड शहरापेक्षा अधिक डोसचा पुरवठा सुरू असल्याचे समजते.

Web Title: Sometimes a shortage of doses and sometimes a shortage of syringes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.