कहीं दूर जब दिन ढल जाये...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 10:35 PM2019-06-05T22:35:32+5:302019-06-05T22:36:21+5:30

स्वत:च्या आयुष्याशी बोलताना, काहीतरी गुणगुणताना सुवर्ण काळातील संवेदनशील गाणी सहजच ओठांवर येतात. ‘काहीं दूर जब दिन ढल जाये..., कईं बार युंही देखा है..., जब कोई बात बिगड जाये...’ अशी काही मर्मस्पर्शी गीते आयुष्याचा अर्थ उलगडणारी वाटतात. अशी भावस्पर्शी व काही हलक्याफुलक्या गीतांचा चिंब करणारा अनुभव नागपूरकर रसिकांनी घेतला.

Somewhere far away when the day falls ... | कहीं दूर जब दिन ढल जाये...

कहीं दूर जब दिन ढल जाये...

googlenewsNext
ठळक मुद्देरसिकांनी अनुभवल्या गोल्डन मेलोडीज : सिद्धिविनायक पब्लिसिटीचे आयोजन

लोकमत  न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वत:च्या आयुष्याशी बोलताना, काहीतरी गुणगुणताना सुवर्ण काळातील संवेदनशील गाणी सहजच ओठांवर येतात. ‘काहीं दूर जब दिन ढल जाये..., कईं बार युंही देखा है..., जब कोई बात बिगड जाये...’ अशी काही मर्मस्पर्शी गीते आयुष्याचा अर्थ उलगडणारी वाटतात. अशी भावस्पर्शी व काही हलक्याफुलक्या गीतांचा चिंब करणारा अनुभव नागपूरकर रसिकांनी घेतला.
निमित्त होते श्री सिद्धिविनायक पब्लिसिटीतर्फे आयोजित ‘गोल्डन मेलोडीज’ या कार्यक्रमाचे. सिद्धिविनायकचे समीर पंडित यांची संकल्पना असलेला हा कार्यक्रम बुधवारी वसंतराव देशपांडे सभागृहात झाला. सिनेसंगीताच्या भावबंधातील ही मैफिल नागपूरच्या प्रथितयश गायकांनी सजविली. व्हॉईस ऑफ मुकेश म्हणून प्रसिद्ध अरविंद पाटील, व्हॉईस ऑफ किशोरदा म्हणून ओळखले जाणारे सागर मधुमटके तसेच सारंग जोशी, श्रेया खराबे, सोनाली दीक्षित व युवा गायिका शिवानी जोशी या गायक कलावंतांनी त्यांच्या सुमधूर स्वरांनी ही बहारदार मैफिल सजविली. सारंग यांनी ‘सुरमई अखियों से...’ या गीताने सुरुवात केल्यानंतर सोनाली यांनी ‘ये कहां आ गये हम...’ या गीतातून भावनांना स्पर्श केला. पुढे अरविंद पाटील यांनी ‘किसी की मुस्कुराहटों पे हो निसार..., कभी कभी मेरे दिल मे..., चंदन सा बदन..., कहीं दूर जब दिन ढल जाये..., जो तुमको हो पसंद वहीं बात.. चाँद को क्या मालुम..., क्या खूब लगती हो..., दिल की नजर से...’ अशी लोकप्रिय गीते सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळविली. ‘बचना ऐ हसिनो...’ म्हणत सागरने एन्ट्री केली आणि पुढे ‘रूक जाना नही..., जब कोई बात बिगड जाये..., ये दोस्ती हम नही तोडेंगे..., तुम जो मिल गये हो...’ ही गाणी मस्तीभऱ्या अंदाजात सादर केली.
या गायकांनी ‘ना मांगू सोना चांदी..., झुठ बोले कौआ काटे..., ये रात भिगी भिगी..., एक चतुर नार..., आजा आजा मै हू प्यार तेरा..., डम डम डिगा डिगा..., ये मेरा दिल प्यार का दिवाना..., यम्मा यम्मा...’ अशी काही हलक्याफुलक्या अंदाजातील गाणी मधुरपणे सादर करून कार्यक्रमात रंगत भरली. अरविंद यांच्या ‘जिना यहां मरना यहां...’ या गीताने कार्यक्रमाची सांगता केली.
गायक कलावंतांसह सिंथेसायजरवर राजा राठोड, गिटार गौरव टांकसाळे, तबला प्रशांत नागमोते, ढोलक अशोक टोकलवार, व्हायोलिन अमर शेंडे, ड्रम्स राजू गजभिये आणि ऑक्टोपॅडवर नंदू गोहाने यांचा सहभाग होता. निवेदन डॉ. मनोज साल्पेकर यांचे होते. कार्यक्रमात प्रभारी जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, न्यायमूर्ती हक, हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, रवींद्र दुरुगकर, गिरीश गांधी, बाबुराव तिडके प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: Somewhere far away when the day falls ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.