मुलाने केली वडिलांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:07 AM2021-06-10T04:07:31+5:302021-06-10T04:07:31+5:30
नरखेड : शेती व घराच्या वाटणीची मागणी करीत मुलाने वडिलांना मारहाण करून जखमी केले. ही घटना नरखेड पाेलीस ठाण्याच्या ...
नरखेड : शेती व घराच्या वाटणीची मागणी करीत मुलाने वडिलांना मारहाण करून जखमी केले. ही घटना नरखेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील खरसाेली येथे रविवारी (दि.६) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली.
रामेश्वर परसराम सरयाम (३५, रा. खरसाेली, ता. नरखेड) असे आराेपी मुलाचे नाव असून, परसराम टिल्लूची सरयाम (६२, रा. खरसाेली) असे जखमी वडिलांचे नाव आहे. आराेपी रामेश्वर हा दारू पिऊन आला व वडिलांना घराचा हिस्सा मागू लागला. यावर वडिलांनी ‘आम्ही जिवंत आहे, तेव्हापर्यंत शेती व घराचा हिस्सा देत नाही’ असे म्हटले असता, आराेपीने घरात ठेवलेली कुऱ्हाड काढून वडिलांच्या हातावर मारून त्यांना जखमी केले. याप्रकरणी परसराम सरयाम यांच्या तक्रारीवरून नरखेड पाेलिसांनी भादंवि कलम ३२४ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास पाेलीस नाईक राजेश हावरे करीत आहेत.