मुलाने केली वडिलांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:07 AM2021-06-26T04:07:52+5:302021-06-26T04:07:52+5:30

काेंढाळी : शेती आपल्या नावाने करून देण्याची मागणी करीत मुलाने वडिलांशी वाद घालायला सुरुवात केली. त्यातच मुलाने वडिलांच्या डाेक्यावर ...

The son beats the father | मुलाने केली वडिलांना मारहाण

मुलाने केली वडिलांना मारहाण

Next

काेंढाळी : शेती आपल्या नावाने करून देण्याची मागणी करीत मुलाने वडिलांशी वाद घालायला सुरुवात केली. त्यातच मुलाने वडिलांच्या डाेक्यावर खुर्चीने प्रहार केल्याने वृद्ध वडील जखमी झाले. ही घटना काेंढाळी (ता. काटाेल) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बाजारगाव येथे गुरुवारी (दि. २४) रात्री घडली.

रामभाऊ काेठीराम इंगळे (७२, रा. बाजारगाव, ता. नागपूर ग्रामीण) असे जखमी वडिलांचे नाव आहे. त्यांना दाेन मुली व सुधीर (४२) नावाचा मुलगा आहे. तिघेही विवाहित असून, त्यांची शिवासावंगा नजीकच्या आकेवाडा शिवारात सात एकर शेती आहे. सुधीरने ती शेती त्याच्या नावाने करून देण्याबाबत वडिलांकडे तगादा लावला. रामभाऊ त्यांची अर्धी शेती सुधीरच्या नावे करायला तयार हाेते. मात्र, सुधीर पूर्ण शेती नावे करायची मागणी करीत हाेता. याच कारणावरून दाेघांमध्ये उद्भवलेला वाद विकाेपास गेला आणि सुधीरने वृद्ध वडील रामभाऊ यांच्या डाेक्यावर खुर्चीने प्रहार केले. त्यात त्यांच्या डाेक्याला दुखापत झाली. त्यांच्यावर काेंढाळी येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात उपचार करण्यात आले. त्यांच्या तक्रारीवरून काेंढाळी पाेलिसांनी सुधीरविरुद्ध भादंवि ३२४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास ठाणेदार विश्वास पुल्लरवार करीत आहेत.

Web Title: The son beats the father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.