मध्यरात्रीचा थरार, कुऱ्हाडीचे घाव घालत जावयाने सासू-सासऱ्याला संपविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2022 10:38 AM2022-06-27T10:38:32+5:302022-06-27T11:04:45+5:30

सासऱ्याने या सर्व बकऱ्या विकून त्याचे पैसे आपल्याला द्यावे तसेच घर आपल्या नावे करून द्यावे, यासाठी नरमू सासरा व पत्नीकडे तगादा लावायचा. परंतु, सासऱ्याने त्याची ही मागणी मनावर घेतली नव्हती.

son-in-law killed elderly couple with axe in nagpur | मध्यरात्रीचा थरार, कुऱ्हाडीचे घाव घालत जावयाने सासू-सासऱ्याला संपविले

मध्यरात्रीचा थरार, कुऱ्हाडीचे घाव घालत जावयाने सासू-सासऱ्याला संपविले

Next
ठळक मुद्देपत्नी अन् मुलगीही गंभीर जखमी आराेपी जावई अटकेत

हिंगणा (नागपूर) : सासऱ्याने त्याच्या बकऱ्या विकून आपल्याला पैसे द्यावे व त्याचे घर आपल्या नावे करून द्यावे यावरून सुरू असलेल्या वादात संतापलेल्या जावयाने मध्यरात्री सासू व सासऱ्याची कुऱ्हाडीने घाव घआलून हत्या केली. यात त्याची पत्नी व सावत्र मुलगीही जखमी झाली. ही घटना एमआयडीसी (ता. हिंगणा) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नीलडाेह येथे घडली. घटनेनंतर पसार झालेल्या क्रूरकर्म्याला पोलिसांनी पहाटे अटक केली आहे.   

भगवान बाळकृष्ण रेवारे (६५) व पुष्पा भगवान रेवारे (६२) असे मृत सासरा व सासूचे नाव असून, कल्पना (४०) व मुस्कान संतलाल मंडलीय (१५) असे जखमी पत्नी व सावत्र मुलीचे तसेच नरमू सीता यादव असे अटकेतील आराेपी जावयाचे नाव आहे. हे सर्व जण अमरनगर, नीलडाेह, ता. हिंगणा येथे राहतात. नरमू हा वाहनचालक म्हणून काम करायचा व त्याच्या सासऱ्याच्या घरी राहायचा.

घटनेच्या रात्री शनिवारी सर्वांनी एकत्र जेवण केले आणि आपापल्या खाेलीत झाेपायला गेले. एका खाेलीत पत्नी कल्पना व मुलगा महेंद्र तर दुसऱ्या खाेलीत सासरा, सासू व मुलगी मुस्कान झाेपली हाेती. मध्यरात्री नरमूच्या ओरडण्याचा आवाज आल्याने सासरा, सासू व मुस्कान जागे झाले. त्यांनी कल्पनाच्या खाेलीत बघितले असता, नरमू तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ करीत हाेता. त्यांचे भांडण साेडविण्यासाठी सासू पुष्पा सरसावली असता, त्याने तिला लाथ मारून ढकलले.

दरम्यान, सासरा भगवान त्याला समजावण्याचा प्रयत्न करीत असताना नरमूने त्याला शिवीगाळ करीत आधी काठीने जबर मारहाण केली. त्यानंतर कुऱ्हाडीने त्याच्या डाेके व खांद्यावर वार केले. तो एवढ्यावरच थांबला नाही तर ओढत घराबाहेर आणले व सिमेंटचा दगड त्याच्या डाेक्यावर टाकला. एवढेच नव्हे तर, त्याने सासू पुष्पा, पत्नी कल्पनावरही कुऱ्हाडीने वार केले. मुस्कानलाही काठीने मारहाण करून जखमी केले.

यात सासू-सासऱ्याचा मृत्यू झाला. दाेघांचा मृत्यू झाल्याची खात्री पटताच त्याने रक्ताने माखलेले कपडे बदलवून पळ काढला. नागरिकांकडून माहिती मिळताच पाेलिसांनी लगेच घटनास्थळ गाठले. पाेलिसांनी दाेन्ही जखमींना लता मंगेशकर हाॅस्पिटलमध्ये भरती केले तर नरमूचा शाेध घेत त्याला पहाटे वानाडाेंगरी परिसरात अटक केली.

पाेलीस उपायुक्तद्वय लाेहित मतानी व गजानन राजमाने, सहायक पोलीस आयुक्त प्रवीण तेजाळे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी एमआयडीसी पाेलिसांनी मुस्कानच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक विनाेद गिरी करीत आहेत.

कल्पना, नरमूचे दुसरे लग्न

कल्पनाचा पहिला पती संतलाल मंडलीय हा तिला साेडून गेल्याने तिने सन २०१३ मध्ये नरमूसाेबत दुसरे लग्न केले. कल्पनाला पहिल्या पतीपासून मुस्कान ही मुलगी असून, ती जिल्हा परिषद हायस्कूल नीलडाेह येथे १० व्या वर्गात शिकत आहे. नरमूला महेंद्र नावाचा आठ वर्षांचा मुलगा आहे. नरमू कल्पनाशी लग्न केल्यापासून तिच्या वडिलांकडेच एकत्र राहयचा.

सासऱ्याच्या बकऱ्यांवर डाेळा

नरमूचा सासरा भगवान रेवारे हा बकरीपालन करायचा. त्याच्याकडे सध्या ४५ ते ५० बकऱ्या आहेत. सासू पुष्पा ही घरकाम करायची. सासऱ्याने या सर्व बकऱ्या विकून त्याचे पैसे आपल्याला द्यावे तसेच घर आपल्या नावे करून द्यावे, यासाठी नरमू सासरा व पत्नीकडे तगादा लावायचा. परंतु, सासऱ्याने त्याची ही मागणी मनावर घेतली नव्हती. घटनेच्या रात्री त्याने बकऱ्या व घर त्याच्या नावे करून देण्यासाेबत बाहेरगावी जाण्यासाठी व माेबाईल फोन खरेदी करण्यासाठी पैशाची मागणी केली हाेती. यावरून ह वाद वाढला.

Web Title: son-in-law killed elderly couple with axe in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.