SSC Result 2020; नागपुरातील भाजीविक्रेताच्या मुलाने मिळवले घवघवीत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 04:43 PM2020-07-29T16:43:46+5:302020-07-29T16:44:26+5:30

शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात शिकणाऱ्या निखिल रमेश नंदनवार या विद्यार्थ्याने ९० टक्के गुण मिळवीत शाळेत प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. हा विद्यार्थी व त्याचे वडील भाजी विकण्याचा व्यवसाय करतात.

The son of a vegetable seller in Nagpur has achieved great success | SSC Result 2020; नागपुरातील भाजीविक्रेताच्या मुलाने मिळवले घवघवीत यश

SSC Result 2020; नागपुरातील भाजीविक्रेताच्या मुलाने मिळवले घवघवीत यश

Next
ठळक मुद्देनिकाल आला तेव्हा तो आठवडीबाजारात विकत होता भाजी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात शिकणाऱ्या निखिल रमेश नंदनवार या विद्यार्थ्याने ९० टक्के गुण मिळवीत शाळेत प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. विशेष म्हणजे हा विद्यार्थी व त्याचे वडील भाजी विकण्याचा व्यवसाय करतात.
अतिशय शांत व मनमिळावू स्वभावाचा हा विद्यार्थी असून त्याने आपल्या वडिलांचा व्यवसाय सांभाळत सर्व अभ्यास केला होता. त्याच्या निकालाची वार्ता घेऊन जेव्हा शिक्षक त्याच्या घरी गेले तेव्हा तो आठवडी बाजारात भाजी विकण्यासाठी गेल्याचे कळले. त्याला जेव्हा ही आनंदवार्ता कळवली तेव्हा त्याच्या डोळ््यातून आनंदाश्रू वाहू लागले. शिक्षक व आईवडिलांच्या पाया पडून तो पुन्हा भाजी विकण्यासाठी निघून गेला. त्याचे परिसरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Web Title: The son of a vegetable seller in Nagpur has achieved great success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.