सोनिया-राहुल गांधींच्या दौऱ्याची रूपरेषा ठरणार

By Admin | Published: March 20, 2016 03:03 AM2016-03-20T03:03:16+5:302016-03-20T03:03:16+5:30

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त काँग्रेसतर्फे राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित केल्यानंतर ...

Sonia-Rahul Gandhi's visit will be outlined | सोनिया-राहुल गांधींच्या दौऱ्याची रूपरेषा ठरणार

सोनिया-राहुल गांधींच्या दौऱ्याची रूपरेषा ठरणार

googlenewsNext

पक्ष पदाधिकाऱ्यांची आज बैठक : अशोक चव्हाण, मोहनप्रकाश राहणार उपस्थित
नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त काँग्रेसतर्फे राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित केल्यानंतर ११ एप्रिल रोजी नागपुरात भव्य समारोपीय सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी हे दोघेही उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या आखणीसाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांच्या उपस्थितीत रविवारी नागपुरात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी ९ ते १४ एप्रिल दरम्यानची कुठलीही एक तारीख ठरविण्यात येणार होती. अखेर ११ एप्रिल ही तारीख अंतिम झाली आहे. सोनिया गांधी व राहुल गांधी कार्यक्रमाच्या अगोदर दीक्षाभूमी येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतील. त्यानंतर मुख्य सोहळ्याच्या स्थानी जातील. या कार्यक्रमाचे अंतिम स्थळ व एकूण रूपरेषा ठरविण्यासाठी रविवारी दुपारी १.३० वाजता राणी कोठी येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला कॉंग्रेसचे विदर्भातील माजी मंत्री, आजी-माजी आमदार, जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत कार्यक्रमाची एकूण आखणी करण्यात येईल, अशी माहिती शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी दिली.(प्रतिनिधी)

Web Title: Sonia-Rahul Gandhi's visit will be outlined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.