ऑडिटरचे नाव घेताच १.४० लाखाने बिल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 11:29 PM2020-10-10T23:29:29+5:302020-10-10T23:33:59+5:30

Corona Patient Harassment,Nagpur news खासगी हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांची लूट सुरू आहे. धंतोली येथील कोलंबिया हॉस्पिटलने एका ५७ वर्षीय महिला रुग्णाचे ६ दिवसाचे बिल १.८० लाख काढले होते. शासकीय दराच्या तुलनेत ही रक्कम अधिक होती. रुग्णाच्या नातेवाईकांनी या संदर्भात मनपाच्या ऑडिटरकडे जाण्याची धमकी देताच बिल ४० हजार करण्यात आले.

As soon as the name of the auditor is mentioned, the bill is reduced by 1.40 lakh | ऑडिटरचे नाव घेताच १.४० लाखाने बिल कमी

ऑडिटरचे नाव घेताच १.४० लाखाने बिल कमी

googlenewsNext
ठळक मुद्देकोलंबिया हॉस्पिटलचे प्रकरण : कोविड रुग्णांकडून जादाची वसुलीमनपाचे अतिरिक्त आरोग्य अधिकारीच हॉस्पिटलचे संचालक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खासगी हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांची लूट सुरू आहे. धंतोली येथील कोलंबिया हॉस्पिटलने एका ५७ वर्षीय महिला रुग्णाचे ६ दिवसाचे बिल १.८० लाख काढले होते. शासकीय दराच्या तुलनेत ही रक्कम अधिक होती. रुग्णाच्या नातेवाईकांनी या संदर्भात मनपाच्या ऑडिटरकडे जाण्याची धमकी देताच बिल ४० हजार करण्यात आले. विशेष म्हणजे या हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रवीण गंटावार हे मनपाचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी आहेत. त्यामुळे लोकांना नियम, कायदे सांगणारेच रुग्णांकडून अधिक बिल वसूल करीत आहेत. अशा परिस्थितीत अन्य खासगी रुग्णालयांना लगाम कोण घालणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अंजिरा जुमडे या महिलेला कोलंबिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना दोन दिवस आईसीयू मध्ये तर चार दिवस सामान्य वॉर्डात ठेवले. परंतु संपूर्ण बिल आईसीयूचे लावण्यात आले. दररोज २५ हजाराप्रमाणे सहा दिवसाचे बिल १.५० लाख काढण्यात आले. अन्य खर्च जोडून १.८०लाख बिल आकारण्यात आले. आॅडिटरने बिल दुरुस्त करण्याची मागणी केली असता हॉस्पिटल व्यवस्थापनाने ६० हजार बिल भरण्यास सांगितले. आईसीयूचे दोन दिवसाचे १५ हजार तर सामान्य वॉर्डाचे चार दिवसाचे १६ हजार आकारण्यात आले.
रुग्णाला दाखल करताना ६० हजार जमा करण्यात आले होते. नंतर हॉस्पिटलने २० हजार परत केले. रुग्णांच्या नातेवाईकांनी भाजप नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना यासंदर्भात फोनवरून माहिती दिली होती. त्यांनी आॅडिटरला बिल तपासण्यास सांगितले. परंतु शहरातील अन्य रुग्णांलयातही अशीच लूट सुरू आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी असाच पुढाकार घेण्याची गरज आहे.

अतिरिक्त बिल वसूल केले नाही : गंटावार
रुग्णाला भरती करताना ६० हजार जमा केले. डिस्चार्ज देताना ४० हजार रुपये बिल आकारण्यात आले. २० हजार परत केले. १.८० लाखाचे बिल रफ होते. आधी रुग्णाच्या नातेवाईकांनी विमा क्लेम असल्याचे सांगितले होते. नंतर मात्र पैसे नसल्याचे सांगितले. त्यामुळे बिलात सुधारणा करण्यात आली. अतिरिक्त बिल वसुलण्यात आलेले नाही. अशी माहिती हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. प्रवीण गंटावार यांनी दिली.

Web Title: As soon as the name of the auditor is mentioned, the bill is reduced by 1.40 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.