पदाधिकाऱ्यांनी खुर्च्या सोडताच ‘डीबीए’ची निवडणूक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 07:18 PM2018-09-18T19:18:26+5:302018-09-18T19:21:42+5:30

जिल्हा विधिज्ञ संघटनेच्या (डीबीए) पदाधिकाऱ्यांनी अवैधरीत्या ताब्यात ठेवलेल्या खुर्च्या सोमवारी सायंकाळी सोडल्या आणि निवडणूक समितीने अतिशय वेगवान व प्रशंसनीय कार्य करताना एकाच दिवसात म्हणजे मंगळवारी सायंकाळी संघटनेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे संघटनेच्या सदस्यांची निवडणुकीची दीर्घ प्रतीक्षा अखेर संपली. कार्यक्रमानुसार, २०१८ ते २०२० या दोन वर्षाच्या कार्यकाळासाठी नवीन कार्यकारिणी निवडण्याकरिता २६ आॅक्टोबर रोजी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीमध्ये मतदान घेतले जाणार आहे.

As soon as the office-bearers leave the chair, declare the election of DBA | पदाधिकाऱ्यांनी खुर्च्या सोडताच ‘डीबीए’ची निवडणूक जाहीर

पदाधिकाऱ्यांनी खुर्च्या सोडताच ‘डीबीए’ची निवडणूक जाहीर

googlenewsNext
ठळक मुद्देसदस्यांची प्रतीक्षा संपली : जिल्हा न्यायालयात २६ आॅक्टोबरला मतदान

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा विधिज्ञ संघटनेच्या (डीबीए) पदाधिकाऱ्यांनी अवैधरीत्या ताब्यात ठेवलेल्या खुर्च्या सोमवारी सायंकाळी सोडल्या आणि निवडणूक समितीने अतिशय वेगवान व प्रशंसनीय कार्य करताना एकाच दिवसात म्हणजे मंगळवारी सायंकाळी संघटनेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे संघटनेच्या सदस्यांची निवडणुकीची दीर्घ प्रतीक्षा अखेर संपली. कार्यक्रमानुसार, २०१८ ते २०२० या दोन वर्षाच्या कार्यकाळासाठी नवीन कार्यकारिणी निवडण्याकरिता २६ आॅक्टोबर रोजी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीमध्ये मतदान घेतले जाणार आहे.
सर्व बाजूने टीका सुरू झाल्यामुळे मागील कार्यकारिणीने सोमवारी सायंकाळी त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या निवडणूक समितीकडे हस्तांतरित केल्या होत्या. त्यानंतर निवडणूक समितीने मंगळवारीच निवडणूक कार्यक्रम निश्चित करून तो सायंकाळी जाहीर केला. ज्येष्ठ वकील अ‍ॅड. के. बी. आंबिलवाडे निवडणूक समितीचे अध्यक्ष असून सदस्यांमध्ये शैलेश दडिया, पी. के. मिश्रा व अब्दुल बशीर यांचा समावेश आहे. मागील कार्यकारिणीचा दोन वर्षांचा कार्यकाळ २२ जानेवारी २०१७ रोजीच संपला होता. परंतु, ते आतापर्यंत पदावर कायम होते. यापूर्वीची कार्यकारिणीही अशीच वागली होती. त्या कार्यकारिणीने कार्यकाळ संपल्यानंतर तब्बल १६ महिने खुर्च्या सोडल्या नव्हत्या. त्या कार्यकारिणीत अ‍ॅड. सुदीप जयस्वाल अध्यक्ष तर, अ‍ॅड. मनोज साबळे सचिव होते. त्यावेळी संबंधित कार्यकारिणीवरही बरीच टीका झाली होती. कोंडी असह्य झाल्यानंतर त्या कार्यकारिणीने निवडणूक जाहीर केली होती. त्यानंतर २३ जानेवारी २०१५ रोजी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल तर, सचिवपदी अ‍ॅड. नितीन तेलगोटे विजयी झाले होते.

असा आहे निवडणूक कार्यक्रम
२४ सप्टेंबर - थकित सदस्यता शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख.
२९ सप्टेंबर - प्राथमिक मतदार यादी जाहीर केली जाईल.
१ आॅक्टोबर - दुपारी ४.३० वाजतापर्यंत प्राथमिक मतदार यादीवर आक्षेप नोंदविता येतील. त्यानंतर ६.३० वाजतापर्यंत आक्षेपांवर निर्णय दिले जातील.
३ आॅक्टोबर - अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल.
४ आॅक्टोबर - सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत नामनिर्देशनपत्र वितरित केले जातील.
९ आॅक्टोबर - सायंकाळी ५.१५ वाजतापर्यंत नामनिर्देशनपत्र सादर करता येतील.
१० आॅक्टोबर - नामनिर्देशनपत्रांची पडताळणी करून सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत वैध नामनिर्देशनपत्रांची यादी जाहीर केली जाईल.
११ आॅक्टोबर - सायंकाळी ५ वाजतापर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील.
१२ आॅक्टोबर - सायंकाळी ५.१५ वाजता उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाईल.
२६ आॅक्टोबर - जिल्हा न्यायालयाच्या इमारतीमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत मतदान घेतले जाईल.
२७ आॅक्टोबर - मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाईल.

Web Title: As soon as the office-bearers leave the chair, declare the election of DBA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.