स्टेजवर येताच मुन्नाभाईने विचारले, कैसे हो मामू..?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 09:29 PM2021-12-17T21:29:28+5:302021-12-17T21:30:15+5:30
Nagpur News शुक्रवारी संध्याकाळी खच्चून भरलेल्या मैदानावरील व्यासपीठावर जेव्हा संजय दत्तने एन्ट्री घेतली तेव्हा त्याच्या चाहत्यांनी टाळ्या, शिट्ट्या व आरोळ्याच्या दणदणाटात त्याचे जंगी स्वागत केले..
नागपूर: शुक्रवारी संध्याकाळी खच्चून भरलेल्या मैदानावरील व्यासपीठावर जेव्हा संजय दत्तने (Sanjay Dutt) एन्ट्री घेतली तेव्हा त्याच्या चाहत्यांनी टाळ्या, शिट्ट्या व आरोळ्याच्या दणदणाटात त्याचे जंगी स्वागत केले.. या स्वागताला तितकेच जंगी उत्तर देताना, संजूबाबाने, कैसे हो मामू..? असा सवाल करून त्यांच्या पुन्हा टाळ्याचा गजर मिळविला.. हे निमित्त होते, खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे.
अभिनेता संजय दत्त यांच्या हस्ते खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थितीत होती. या महोत्सवाच्या आरंभी ख्यातनाम गायक सुखविंदर सिंग यांची लाईव्ह कन्सर्ट आयोजित करण्यात आली.
आपल्या दिलखुलास शैलीत बोलताना संजय दत्त पुढे म्हणाले, मुन्नाभाई-३ ची मी प्रतिक्षा करीत आहे. मला भाषण देता येत नाही. याप्रसंगी उपस्थित असलेले लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांना उद्देशून, मु्न्नाभाईने, त्यांच्या भाषणकौशल्याचे कौतुक केले.
याप्रसंगी संजूबाबाने नितीन गडकरी यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त करताना, त्यांच्यासारखे नेतृत्व अजून दुसरे पाहण्यात आले नाही, आपले वडिल सुनिल दत्त यांच्यात जे गुण पाहिले ते मी गडकरींमध्येही पाहतो असे म्हटले.