स्त्री अस्तित्वाचा शंखनाद, ठिकठिकाणी साजरा झाला सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:08 AM2021-03-09T04:08:07+5:302021-03-09T04:08:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सोमवारी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन विविध संघटना, संस्थांनी वेगवेगळ्या माध्यमातून साजरा केला. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोमवारी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन विविध संघटना, संस्थांनी वेगवेगळ्या माध्यमातून साजरा केला. यानिमित्ताने अनेक नवसंकल्पनांचा शुभारंभ करण्यात आला. स्त्री ही केवळ शोभेची बाहुली नाही किंवा अबला नाही. ती कुणाच्या उपकाराची धनी नाही आणि तिचे अस्तित्व नाकारण्याचा कुणालाच अधिकार नाही, अशा भावनांसह प्रथमच नागपुरातून महिलाविषयक नव्या चळवळींची आधारशिला ठेवण्यात आली. आता स्त्री ही पीडित, अबला म्हणून नव्हे तर स्त्री ही नव्या युगाची प्रणेती असल्याचा भाव जागविणाऱ्या घोषणा जागतिक महिला दिनी देण्यात आल्या. या दिवसाचे स्वागत अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो पॉईंटवर शंखनाद करून करण्यात आले तर, महिलांना सार्वजनिक ठिकाणी शौचालये, स्वच्छतागृहांची योजना असावी, याबाबत देशभरात ऑनलाईन याचिकेवर स्वाक्षरी मोहिमेचा नागपुरातूनच शुभारंभ करण्यात आला.
आशा वर्कर्सतर्फे महिला दिन ()
सीटूच्या आशा वर्कर्सच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. आशा वर्कर्स युनियन, जनवादी महिला समितीने राजेंद्र साठे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी प्रीती मेश्राम, रंजना पौनीकर, विजया जांभूळकर, ललिता गायकवाड, शालिनी सहारे, कांचन बोरकर, मंगला बागडे उपस्थित होत्या.
-----------