नागपूरच्या  गिट्टीखदान शोभायात्रेत ‘जय हनुमान’चे स्वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 11:34 PM2018-03-31T23:34:09+5:302018-03-31T23:39:29+5:30

गिट्टीखदान येथे भोसलेकालीन हनुमान मंदिर आहे. या मंदिरातून हनुमान जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. पालकमंंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर देशमुख, आ. प्रकाश गजभिये, नासुप्रचे विश्वस्त भूषण शिंगणे, नगरसेवक हरीश ग्वालबन्सी, नितीश ग्वालबन्सी, रमेश चोपडे, प्रगती पाटील, शिल्पा कांबळे-धोटे, मीना तिडके आदींच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. यानंतर ‘पवनसूत हनुमान की जय’चा गजर करीत शोभायात्रा निघाली.

The sound of 'Jai Hanuman' in the Gittitkhadan Shobha Yatra of Nagpur | नागपूरच्या  गिट्टीखदान शोभायात्रेत ‘जय हनुमान’चे स्वर

नागपूरच्या  गिट्टीखदान शोभायात्रेत ‘जय हनुमान’चे स्वर

googlenewsNext
ठळक मुद्दे४४ वर्षांपासून निघतेय शोभायात्रा : भाविकांची गर्दी, प्रसाद वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गिट्टीखदान येथे भोसलेकालीन हनुमान मंदिर आहे. या मंदिरातून हनुमान जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. पालकमंंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर देशमुख, आ. प्रकाश गजभिये, नासुप्रचे विश्वस्त भूषण शिंगणे, नगरसेवक हरीश ग्वालबन्सी, नितीश ग्वालबन्सी, रमेश चोपडे, प्रगती पाटील, शिल्पा कांबळे-धोटे, मीना तिडके आदींच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. यानंतर ‘पवनसूत हनुमान की जय’चा गजर करीत शोभायात्रा निघाली.
शोभायात्रेचे हे ४४ वे वर्षे आहे. शोभायात्रेत २१ चित्ररथ व देखाव्यांचा समावेश होता. आकर्षक रोषणाई लक्ष वेधून घेत होती. प्रभू श्रीराम, हनुमान यांच्या भजनाचे स्वर लाऊडस्पीकरमधून गुंजत होते. हनुमानजींची दोन फुटांची चांदीची तयार करण्यात आलेली मूर्ती लक्ष वेधून घेत होती. याशिवाय रामभजन करताना हनुमानजी व वानरसेना, सूर्यरथ, महालक्ष्मीपूजन करताना माता सरस्वती, श्रीक्षेत्र केदारनाथ दर्शन, तुळजाभवानी दर्शन, विष प्राशन करताना शंकरजी, राधा-कृष्ण, साईबाबा, महालक्ष्मी, राम वनवासात जात असतानाचा देखावा, संत गजानन महाराज, बद्रीनाथ दर्शन, भगवान तिरुपती बालाजी, भगवान श्रीकृष्ण रणांगणात अर्जुनाला उपदेश करताना एका हातावर पर्वत उचलणारे हनुमानजी, रामदेवबाबा असे देखावे साकारण्यात आले होते. शोभायात्रा गिट्टीखदान मंदिरातून निघून गोरेवाडा रोड, बोरगाव चौक, अनंतनगर मेनरोड, न्यू चोपडे लॉन, सीआयडी आॅफीस, काटोल रोड चौक, गिट्टीखदान पोलीस स्टेशन, गिट्टीखदान, फ्रेण्डस कॉलनी, जागृती कॉलनी, केटीनगरमार्गे परत गिट्टीखदान मंदिरात आली. शोभायात्रा पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
शोभायात्रेदरम्यान ठिकठिकाणी प्रसाद वितररण, सरबत, पाणी पाऊच वितरणाचे स्टॉल लावण्यात आले होते. होणारा कचरा लागलीच उचलण्यासाठी स्वयंसेवक सज्ज होते. विशेष म्हणजे शोभायात्रेमुळे वाहतुकीस कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात आली. गिट्टीखदान पोलिसांनी यासाठी सहकार्य केले.
मंडळाचे सदस्य घनश्याम मांगे, अशोक डोर्लीकर, सूर्यनारायण ठाकूर, ब्रिजमोहन दिवाण, नंदू हिंगोरानी, हेमंत माहुरे, लखन वानखेडे, शशिकांत बोदड, नरेश बरडे, बबली तिवारी, कृष्णदत्त चौबे, राजू खंडेलवाल, हरीश नागपाल, राजेश पांडे, शीला माहुरे, पुरुषोत्तम मदने, धनराज तेलंग, कपिल मदने, कमलेश पांडे, सचिन पाली, अभय वैद्य आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

Web Title: The sound of 'Jai Hanuman' in the Gittitkhadan Shobha Yatra of Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.