नागपूरच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राची भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 10:50 AM2019-06-04T10:50:14+5:302019-06-04T10:52:11+5:30

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रांमधील उपक्रमांचे आयोजन वाढीस लागले आहे. २०१८-१९ या वर्षात केंद्रामध्ये तब्बल १२७ कार्यक्रम आयोजित झाले.

South Central Regional Cultural Center of Nagpur | नागपूरच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राची भरारी

नागपूरच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राची भरारी

googlenewsNext
ठळक मुद्देवर्षभरात १२७ कार्यक्रमांचे आयोजन साडेसहा कोटींहून अधिकचा खर्च

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रांमधील उपक्रमांचे आयोजन वाढीस लागले आहे. २०१८-१९ या वर्षात केंद्रामध्ये तब्बल १२७ कार्यक्रम आयोजित झाले. यात साडेसहा कोटींहून अधिक निधी खर्च करण्यात आला. तर केंद्रातर्फे या काळात ६० कार्यक्रम प्रायोजित करण्यात आले. माहितीच्या अधिकारात ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राकडे विचारणा केली होती. १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत केंद्रातर्फे किती कार्यक्रम आयोजित करण्यात आले, त्यात किती निधी खर्च झाला, ब्रम्हनाद कार्यक्रमात किती गायक आले व त्यांना किती बिदागी देण्यात आली, १ जानेवारी २०१६ ते ३१ मार्च २०१९ या काळात केंद्रातर्फे किती कार्यक्रम प्रायोजित करण्यात आले इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात १२७ कार्यक्रम आयोजित झाले व यावर ६ कोटी ६९ लाख ७ हजार ६८३ रुपये खर्च झाले.
१ जानेवारी २०१८ ते ३१ मार्च २०१९ या काळात दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे १४४ कार्यक्रम प्रायोजित करण्यात आले. २०१६-१७ मध्ये ५१, २०१७-१८ मध्ये ३३ तर २०१८-१९ मध्ये ६० कार्यक्रम प्रायोजित करण्यात आले. २०१८-१९ मध्ये प्रायोजित कार्यक्रमांवर १ कोटी ४० लाख ४९ हजार ९२१ रुपयांचा खर्च करण्यात आला.
‘ब्रह्मनाद’वर साडेतीन लाखांचा खर्च
२०१८-१९ मध्ये ‘ब्रह्मनाद’चे एकूण सहा कार्यक्रम झाले. यात ११ मुख्य गायक, वादक व त्यांच्या समवेत सहकलाकार सहभागी होते. त्यावर एकूण ३ लाख ६५ हजार रुपये खर्च करण्यात आले. २०१६-१७ ते २०१८-१९ या कालावधीत ‘ब्रह्मनाद’सोडून इतर कार्यक्रमांवर २६ कोटी ५४ लाख ८० हजार ४४६ रुपये खर्च करण्यात आले. २०१७-१८ मध्ये सर्वाधिक ११ कोटी ४१ लाख ८७ हजार २० रुपये खर्च झाले.

Web Title: South Central Regional Cultural Center of Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.