अन्नधान्य पुरवठा व कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकडे विशेष लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:10 AM2021-05-05T04:10:34+5:302021-05-05T04:10:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असताना संपूर्ण यंत्रणा रुग्णसेवेत लागली आहे. मात्र, यासोबतच ...

Special attention to food supply and contact tracing | अन्नधान्य पुरवठा व कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकडे विशेष लक्ष

अन्नधान्य पुरवठा व कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकडे विशेष लक्ष

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असताना संपूर्ण यंत्रणा रुग्णसेवेत लागली आहे. मात्र, यासोबतच लॉकडाऊनच्या काळामधील अन्नधान्य पुरवठा, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, लसीकरण, गृह अलगीकरण, मायक्रो झोन निर्मिती, कॉल सेंटरची संपर्क व्यवस्था या बाबींची काळजी घेण्याचे निर्देश ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री नितीन राऊत यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

नागपूर शहरातील कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.

नागपूर जिल्ह्यामध्ये सध्या ७ लाख ६१४ शिधापत्रिकाधारक आहेत. जिल्ह्यात तेराशे स्वस्त धान्य दुकाने आहेत. अंत्योदयमध्ये ७७ हजार ७८ शिधापत्रिकाधारकांचा समावेश आहे. प्राधान्य धारकांमध्ये ३ लाख १५ हजार ८२ शिधापत्रिकाधारकांचा समावेश आहे. या सर्वांना प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य मोफत वाटप केले जाणे आवश्यक आहे. मात्र, हे वाटप करताना शिधापत्रिकाधारकांपैकी अनेकजण पॉझिटिव्ह असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भात स्वस्त धान्य दुकानदारांनी आक्षेप घेतला आहे. सरकारने रेशन दुकानदारांना पॉश मशीनद्वारे वाटपाची असणारी अट शिथील करावी तसेच त्यांना विम्याचे कवच द्यावे, अशी मागणी पुढे आली असून, या संदर्भात काय उपाययोजना करता येईल, याबाबत प्रशासनाने तोडगा काढावा. याविषयी प्रसंगी वरिष्ठांशी चर्चा करता येईल, असेही सांगितले.

एफसीआयमधून अद्याप धान्याची उचल व्हायची आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानांमध्ये वितरण सुरू होण्यापूर्वी सर्व समस्या निकाली काढण्याचे निर्देशही दिले.

बॉक्स

प्रत्येक पॉझिटिव्ह रुग्णामागे किमान १० ते १५ जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व्हावे.

पूर्वीप्रमाणे प्रत्येक पॉझिटिव्ह रुग्णामागे किमान १० ते १५ जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व्हायला हवे, असे निर्देश पालकमंत्री राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिले. गृह अलगीकरण, मायक्रो झोनमधील रुग्णांशी सातत्याचा संपर्क असणे आवश्यक आहे. मुंबई मनपाने रुग्णांशी संपर्क साधण्यासाठी विशेष व्यवस्था उभारली आहे. त्या मॉडेलचा नागपूरमध्ये उपयोग होतो का, याची चाचपणी करण्यासही त्यांनी सांगितले. महानगरपालिकेने कॉल सेंटर सुरू केले आहे, मात्र त्यातून नागरिकांचे समाधान होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Special attention to food supply and contact tracing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.