‘विको’ला विशेष पुरस्कार
By admin | Published: March 20, 2015 02:18 AM2015-03-20T02:18:36+5:302015-03-20T02:18:36+5:30
‘विको’च्या आयुर्वेदिक उत्पादनांच्या दर्जाबाबत आणि सुरक्षिततेबद्दल जगभरातील घरात पसंतीची मोहोर उमटली आहे. ‘विको’चे नाव आज आबालवृद्धांमध्ये परिचित आहे.
नागपूर : ‘विको’च्या आयुर्वेदिक उत्पादनांच्या दर्जाबाबत आणि सुरक्षिततेबद्दल जगभरातील घरात पसंतीची मोहोर उमटली आहे. ‘विको’चे नाव आज आबालवृद्धांमध्ये परिचित आहे. विकसित आणि विकसनशील देशांमध्ये आयुर्वेदिक उत्पादने म्हणजे ‘विको’असे जणू समीकरण बनले आहे.
गेल्या ६५ वर्षांच्या या अथक परिश्रमांना आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी व सन्मानांनी गौरविले आहे. आपल्या देशातील सर्व उद्योगांमध्ये एक मराठी उद्योग समूहाला ‘माल्टा’नंतर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पारितोषिक प्राप्त होत आहे.
बुधवार, २५ मार्च रोजी क्वालालंपूर-मलेशिया येथे अत्यंत सन्मानाचा ‘गोल्डन ग्लोब टायगर’ हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती विको उद्योग समूहाचे संचालक संजीव पेंढारकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. ‘विको’ला नुकतेच कॉर्पोरेट एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित केले आहे. विविध उत्पादनांच्या भाऊगर्दीत वाढत्या स्पर्धेला तोंड देऊन उत्पादनांचा दर्जा कायम ठेवून आयुर्वेदिक परंपरेचा वासरा जतन करीत ग्राहकहिताला, ग्राहक संतोषाला विकोने नेहमीच अग्रस्थान दिले आहे. या पुरस्कारामुळे जागतिक पातळीवर आपल्या देशाला, मराठी माणसाला मानाचे स्थान प्राप्त होणार आहे. या पुरस्कार सोहळ्यादरम्यान उत्कृष्ट संघटन आणि नूतन नेतृत्व या विषयावर परिसंवाद होणार आहे. जगभरातील सर्व उद्योजक आणि विकोचे संजीव पेंढारकर चर्चा करणार आहेत. (वा. प्र.)