दीक्षाभूमीवर विशेष बुद्धवंदना व धम्मप्रवचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 10:44 PM2020-05-07T22:44:22+5:302020-05-07T22:46:22+5:30
भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त येथील पवित्र दीक्षाभूमीवर बुद्धपौर्णिमेला दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी विशेष बुद्धवंदना घेतली व धम्मप्रवचन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त येथील पवित्र दीक्षाभूमीवर बुद्धपौर्णिमेला दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी विशेष बुद्धवंदना घेतली व धम्मप्रवचन केले.
यावेळी दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, एन. आर. सुटे, सुधीर फुलझेले, अॅड. आनंद फुलझेले यांनी भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला पुष्प अर्पण करून वंदन केले.
यावेळी विलास गजघाटे म्हणाले, बुद्धांच्या करुणेनेच जगातून कोरोना रोग नष्ट होईल. त्यांचा धम्म हा विज्ञानावर आधारित आहे. विज्ञानामुळेच जगाचे कल्याण झाले, हे हजारो वर्षांपासून सिद्ध होत आहे. इतिहासात प्रथमच कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे बुद्धपौर्णिमेला पवित्र दीक्षाभूमीचे द्वार बंद ठेवण्यात आले. फि जिकल डिस्टन्सिंगचे पालन करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व बुद्ध पौार्णिमा घरीच राहून दीप प्रज्वलन आणि वंदनेतून केल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले. यावेळी भन्ते सुगत बोधी, सिद्धार्थ म्हैसकर, निळू भगत, पापा मून, विजय गजभिये उपस्थित होते.