गृहिणींसाठी विशेष व्यवसाय प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:09 AM2020-12-29T04:09:20+5:302020-12-29T04:09:20+5:30

उद्घाटन संताेष नरवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. भगवान गाैतम बुद्ध व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाला ...

Special business training for housewives | गृहिणींसाठी विशेष व्यवसाय प्रशिक्षण

गृहिणींसाठी विशेष व्यवसाय प्रशिक्षण

Next

उद्घाटन संताेष नरवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. भगवान गाैतम बुद्ध व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. काेराेना संक्रमणामुळे उद्याेगधंदे डबघाईस आले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना आर्थिक संकटांना सामाेरे जावे लागत आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी घरातील महिलांनी उद्याेजक व्हावे, असे आवाहन संताेष नरवाडे यांनी यावेळी केले. विविध वस्तू तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल महिलांना संस्थेच्या माध्यमातून पुरविण्यात येणार असल्याची माहिती संचालिका सराेज लाेखंडे यांनी प्रास्ताविकातून दिली. संचालन प्रशांत बाेरकर यांनी केले तर शुभागी भांगे यांनी आभार मानले. यावेळी सोनाली भांगे, दर्शना सहारे, कल्याणी वंजारी, पूजा हुसनापुरे, पाैर्णिमा सोनटक्के, शुभांगी भोवते, विशाखा टेंभरे, सीमा रंगारी, गीता कुलदीप, करिष्मा उके यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

Web Title: Special business training for housewives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.