विशेष मोहिमेत ६४,८५५ मतदार वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 12:41 AM2019-03-19T00:41:35+5:302019-03-19T00:43:13+5:30

३१ जानेवारी २०१९ नंतर १५ मार्चपर्यंत राबवण्यात आलेल्या मतदार नोंदणी मोहिमेंतर्गत नागपूर जिल्ह्यात तब्बल ६४ हजार ८५५ मतदार नव्याने वाढले आहेत. त्यांनी नोंदणी केली असून २५ मार्चपर्यंत त्यांच्या अर्जावर कार्यवाही करून पुरवणी मतदार यादीत त्यांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.

Special campaign has 64,855 voters increased | विशेष मोहिमेत ६४,८५५ मतदार वाढले

विशेष मोहिमेत ६४,८५५ मतदार वाढले

Next
ठळक मुद्देरामटेकमध्ये २४,३२४ तर नागपूरमध्ये ४०,५३१ मतदार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ३१ जानेवारी २०१९ नंतर १५ मार्चपर्यंत राबवण्यात आलेल्या मतदार नोंदणी मोहिमेंतर्गत नागपूर जिल्ह्यात तब्बल ६४ हजार ८५५ मतदार नव्याने वाढले आहेत. त्यांनी नोंदणी केली असून २५ मार्चपर्यंत त्यांच्या अर्जावर कार्यवाही करून पुरवणी मतदार यादीत त्यांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.
नागपूर जिल्ह्यात ३१ जानेवारी २०१९ पर्यंत एकूण ४० लाख २४ हजार १९७ मतदार होते. यामध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघात एकूण २१ लाख २६ हजार ५७४ मतदार होते. तर रामटेक लोकसभा मतदार संघात १८ लाख ९७ हजार ६२३ इतके मतदार होते. यानंतर निवडणूक विभागातर्फे मतदार नोंदणीसाठी विशेष अभियान राबवण्यात आले. १५ मार्चपर्यंत मतदार नोंदणी करण्यात आली. याचा विशेष परिणाम दिसून आला. यादरम्यान तब्बल ६४,८५५ मतदारांनी नव्याने नोंंदणी केली. यामध्ये नागपूर लोकसभा मतदार संघात ४०,५३१ मतदार तर रामटेक लोकसभा मतदर संघात २४,३२४ मतदारांची नव्याने वाढ झाली आहे.
विधानसभानिहाय वाढलेल्या मतदारांची संख्या

रामटेक लोकसभा
-------------
काटोल - ३३०४
सावनेर - २०३९
हिंगणा - २२९५
उमरेड - २४२३
कामठी - ४५७१
रामटेक - २६९२
-----------------
एकूण - २४,३२४

नागपूर लोकसभा
---------------
दक्षिण-पश्चिम नागपूर - ५९०७
दक्षिण नागपूर - ५९२६
पूर्व नागपूर - १०,७५३
मध्य नागपूर - ४७३५
पश्चिम नागपूर - ५३९८
उत्तर नागपूर - ७८१२
------------------------
एकूण - ४०,५३१

Web Title: Special campaign has 64,855 voters increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.