नागपूर विशेष सत्र न्यायालय : नवोदय बँक घोटाळ्यातील दोन आरोपींचा पीसीआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 11:10 PM2019-06-19T23:10:20+5:302019-06-19T23:11:35+5:30

एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाने बुधवारी नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यातील आरोपी राजेश श्रीधर बांते (४३) व राजेश मल्लेशाम बोगुल (३८) यांचा पाच दिवसाचा पीसीआर मंजूर केला. हे दोघेही बँकेमध्ये व्यवस्थापक होते.

Special Court of Nagpur: Two accused in the Navodaya Bank scam PCR | नागपूर विशेष सत्र न्यायालय : नवोदय बँक घोटाळ्यातील दोन आरोपींचा पीसीआर

नागपूर विशेष सत्र न्यायालय : नवोदय बँक घोटाळ्यातील दोन आरोपींचा पीसीआर

Next
ठळक मुद्देआरोपींमध्ये राजेश बांते, राजेश बोगुल यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाने बुधवारी नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यातील आरोपी राजेश श्रीधर बांते (४३) व राजेश मल्लेशाम बोगुल (३८) यांचा पाच दिवसाचा पीसीआर मंजूर केला. हे दोघेही बँकेमध्ये व्यवस्थापक होते. बांते हा बालाजीनगर (मानेवाडा रोड) तर, बोगुल हा जयताळा येथील रहिवासी आहे.
धंतोली पोलिसांनी या आरोपींना मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास अटक केली. तसेच, त्यांना बुधवारी न्यायालयासमक्ष हजर करून त्यांचा १० दिवसाचा पीसीआर देण्याची मागणी केली. सरकारच्यावतीने प्रमुख जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी बाजू मांडली. प्रकरणाचा पुढील तपास, इतर आरोपींना अटक करणे व गुन्ह्यासंदर्भात महत्त्वाच्या गोष्टी उघडकीस आणणे याकरिता आरोपींचा पीसीआर मिळणे आवश्यक आहे असे त्यांनी न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता आरोपींचा पाच दिवसाचा पीसीआर मंजूर केला.
माजी आमदार अशोक धवड व्यवस्थापकीय संचालक असलेल्या या बँकेत ३८ कोटी ७५ लाख २० हजार ६४१ रुपयाचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणात धंतोली पोलिसांनी १५ मे २०१९ रोजी श्रीकांत सुपे (५७) यांच्या तक्रारीवरून भादंविच्या कलम ४०६, ४०९, ४२०, १२०-ब, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७७-अ यासह एमपीआयडी कायदा व माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक फुलपगारे प्रकरणाचा तपास करीत आहेत.
अशोक धवड यांच्यासह बँक संचालिका किरण धवड, संचालक विजय जोशी, गोविंद जोशी, मुकेश जोशी, राकेश जोशी, विकेश जोशी, प्रकाश शर्मा, सचिन मित्तल, प्रीती मित्तल, बालकिशन गांधी, लीना गांधी, हिंगल ग्रुप, झाम ग्रुप, ग्लॅस्टोन ग्रुप, सिगटिया ग्रुप, देवघरे बिल्डर्स, सोमकुवर ग्रुप, गुलरांधे ग्रुप, पिरॅमिड ग्रुप व ३० कर्जदारांची या घोटाळ्यात काय भूमिका आहे याचा शोध पोलीस घेत आहेत.
पोलिसांनी मांडलेले मुद्दे
२०१४-१५ मध्ये बँकेतून चार कोटी तीन लाख रुपयाची उचल करण्यात आली व बनावट कागदपत्राच्या आधारे ती रक्कम बँकेला परत केल्याचे दाखवण्यात आले. प्रकाश शर्मा व विकेश जोशी यांच्या नावाने प्रत्येकी १ कोटी १५ लाख रुपयाचे बनावट कर्ज प्रकरण तयार करण्यात आले. अशा विविध प्रकारे बँकेत घोटाळा करण्यात आला. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी पूर्वी कॉसमॉस बँकेत नोकरीला होते. आर्थिक गैरव्यवहारामुळे त्यांना बडतर्फ करण्यात आले होते असे मुद्दे पोलिसांनी न्यायालयासमक्ष मांडले.

Web Title: Special Court of Nagpur: Two accused in the Navodaya Bank scam PCR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.