नागपुरात पोलिसांसाठी खास कोविड हॉस्पीटल सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 10:36 AM2020-09-29T10:36:50+5:302020-09-29T10:37:12+5:30

पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कोरण्याचा प्रादुर्भाव होत असल्याचे लक्षात घेऊन येथील पोलीस मुख्यालयात असलेल्या हॉस्पिटलमध्ये कोविड हॉस्पिटलची निर्मिती करण्यात आली आहे.

Special covid Hospital for Police started in Nagpur | नागपुरात पोलिसांसाठी खास कोविड हॉस्पीटल सुरू

नागपुरात पोलिसांसाठी खास कोविड हॉस्पीटल सुरू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कोरण्याचा प्रादुर्भाव होत असल्याचे लक्षात घेऊन येथील पोलीस मुख्यालयात असलेल्या हॉस्पिटलमध्ये कोविड हॉस्पिटलची निर्मिती करण्यात आली. २२ सप्टेंबरापासून सुरू झालेल्या या हॉस्पिटलमध्ये १६ बेडची व्यवस्था आहे. त्यातील आठ आयसीयू तर आठ बेड सेमी आयसीयू आहे. प्रत्येक बेडला ऑक्सिमीटर, डिजिटल थर्मामीटर, डेफिब्रीलेटर मशीन प्रत्येक बेडसमोर टीव्ही आहे. पूर्णत: वातानुकूलित असलेले या हॉस्पिटलमध्ये प्रत्येक बेड सीसीटीव्हीच्या निगराणीत आहे. संपकर् ासाठी पीए सिस्टिम संपर्क सुविधा असून येथे रुग्णांसाठी योग टीचरचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

याशिवाय रुग्णाचे मनोबल वाढवण्यासाठी मोटिवेट करण्याचीही व्यवस्था आहे.: पोलिसांच्या परिवारासाठी संपर्काची दैनंदिन व्यवस्था असून चार अ‍ॅम्ब्युलन्सची सोय आहे. त्यातील दोन अ‍ॅम्ब्युलन्समध्ये २४ तास डॉक्टर उपलब्ध राहणार आहेत. रुग्णांसाठी तसेच तेथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी मोफत मेस सुविधा करण्यात आली आहे. ईसीजी मशीन, डिजिटल एक्स-रे, इको मशीन, अल्ट्रा सोनोग्राफी मशीन, पॅथॉलॉजी लॅब, अ‍ॅडव्हान्स पल्स काउंटिंग मशीन आणि अत्याधुनिक केमिकल एनलायझर मशीनच ही या हॉस्पिटलमध्ये सुविधा आहे. येथे हॉस्पिटलचे प्रमुख म्हणून डॉ. संदीप शिंदे यांच्या नेतृत्वात सय्यद तारीक, डॉ. कुंतलेश्वर जांभुळकर आणि डॉ. प्रवीण गावंडे सेवारत आहेत. त्यांच्या मदतीला १६ परिचारिका, ६ वार्ड बॉय आणि चार स्वच्छता कर्मचाऱ्यांची सुविधा आहे. या सर्वांसाठी परिसरातच निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Web Title: Special covid Hospital for Police started in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.