नवरात्रीत रेल्वे प्रवाशांसाठी उपवासाचे भोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 11:54 AM2018-10-11T11:54:14+5:302018-10-11T11:54:52+5:30
प्रवाशांच्या मागणीनुसार नवरात्रीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी ‘आयआरसीटीसी’ (इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरीझम कार्पोरेशन) ने पुढाकार घेऊन प्रवाशांसाठी उपवासाचे भोजन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवरात्रीच्या पर्वावर भाविक सात्विक भोजन करतात. त्यामुळे प्रवाशांच्या मागणीनुसार नवरात्रीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी ‘आयआरसीटीसी’ (इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरीझम कार्पोरेशन) ने पुढाकार घेऊन प्रवाशांसाठी उपवासाचे भोजन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ‘आयआरसीटीसी’तर्फे उपवास असलेल्या प्रवाशांसाठी साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, शिंगाडे पीठाचा शिरा, निवडक भाज्या वापरून तयार केलेले भोजन पुरविण्यात येत आहे. त्यासाठी ‘आयआरसीटीसी’ने आपल्या मेन्यु कार्डमध्ये उपवासाच्या भोजनाचा समावेश केला आहे. हे विशेष भोजन प्रवासातील भाविकांना निवडक रेल्वेस्थानकावर, रेस्टॉरन्टमध्ये पुरविण्यात येत आहे.