शिक्षकांना मतदानासाठी मिळणार जांभळ्या रंगाचा विशेष पेन

By admin | Published: January 23, 2017 09:14 PM2017-01-23T21:14:21+5:302017-01-23T21:14:21+5:30

नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी ३ फेब्रुवारीला मतदार होणार असून ६ फेब्रुवारीला मतमोजणी

Special pen for purple color for teachers | शिक्षकांना मतदानासाठी मिळणार जांभळ्या रंगाचा विशेष पेन

शिक्षकांना मतदानासाठी मिळणार जांभळ्या रंगाचा विशेष पेन

Next

ऑनलाइन लोकमत
नागपूर,, दि. 23 -  नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी ३ फेब्रुवारीला मतदार होणार असून ६ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. मतदानाच्या वेळी मतदाराच्या उजच्या हाताच्या मधल्या बोटावर शाई लावण्यात येणार आहे. तसेच मततदारांना मतदानासाठी प्रशासनाकडून जांभळ्या रंगाचा शाईचा विशेष पेन पूरविण्यात येणार आहे. मतदान नोंदणीसाठी या विशेष पेनतात उपयोग करायचा आहे. इतर पेनचा उपयोग केल्यास मतदान अवैध ठरणार आहे, अशी माहिती शिक्षक मतदार संघ निवडणुकीचे निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली. अनूप कुमार यांनी सांगितले की, नागपूर विभागातील शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची संपूर्ण तयारी झालेली आहे. मतदानासाठी १२४ केंद्र निश्चित करण्यात आले असून यासाठी ६८० अधिकरी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदार म्हणून ३४ हजार ९८७ शिक्षकांनी नोंदणी झाली आहे. मतदनासाठी प्रशासनकडून पूरविण्यात येणाऱ्या विशेष पेन त्यांच्याकडून परत घेण्याकरिता एका मतदान अधिकाऱ्यांची नेमणूक सुद्धा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आचार संहितेदरम्यान विकास काम, महत्त्वाच्या कामांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी दिली. यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीश मोहोड, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, उपायुक्त पापडकर, तहसीलदार श्रीराम मुंधडा उपस्थित होते.
  बावनकुळेंचे वक्तव्य आचार संहितेचा भंग नाही
विधान परिषदेचे आमदार फंड विकतात, असे विधान पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अलीकडेच केले होते. त्यांचे हे वक्तव्य आचार संहिता भंग नसल्याचे स्पष्टीकरण शिक्षक मतदार संघ निवडणुकीचे निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत आचार संहिता भंगाची एकही तक्रार प्राप्त झाली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Special pen for purple color for teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.