विदर्भ विकासासाठी ९५८ कोटींंचा विशेष कार्यक्रम; अनुप कुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 11:32 AM2018-08-11T11:32:18+5:302018-08-11T11:34:10+5:30

विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या जलद विकासासाठी विशेष कार्यक्रम आखण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत विदर्भासाठी ९५८.७८ कोटी रुपयांचा विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे.

Special program of 9 58 crore for development of Vidarbha; Anup Kumar | विदर्भ विकासासाठी ९५८ कोटींंचा विशेष कार्यक्रम; अनुप कुमार

विदर्भ विकासासाठी ९५८ कोटींंचा विशेष कार्यक्रम; अनुप कुमार

Next
ठळक मुद्दे वैधानिक विकास मंडळाची विशेष बैठकनागपूर विभाग ६५५.९५, अमरावती विभागासाठी ३०२.८३

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या जलद विकासासाठी विशेष कार्यक्रम आखण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत विदर्भासाठी ९५८.७८ कोटी रुपयांचा विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये नागपूर विभागासाठी ६५५.९५ आणि अमरावती विभागासाठी ३०२.८३ कोटी रुपये असल्याची माहिती विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष तथा नागपूर विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी अमरावती विभागीय आयुक्त पीयूष सिंह, मंडळाचे तज्ञ सदस्य डॉ. रवींद्र्र कोल्हे, डॉ. कपिल चांद्र्रायण, डॉ. किशोर मोघे, सदस्य सचिव एन.के.नायक आणि नियोजन उपायुक्त कृष्णा फिरके उपस्थित होते.
या विशेष कार्यक्रमात कृषी तसेच कृषी विद्यापीठ, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, व दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय, वनाधारित उद्योग, कौशल्य विकास, रोजगारनिर्मिती, दळणवळण, वित्तीय सेवा पर्यटन व सांस्कृतिक कार्य आणि कृषी सिंचन व जलसंधारण तसेच विद्युत विकास आणि मानव संसाधन विकासासाठी ६९५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी दिली.

नागपूर येथे डिफेन्स आणि एअरोस्पेस क्लस्टर
नागपूर येथे ५३ कोटी रुपये किमतीच्या डिफेन्स आणि एअरोस्पेस क्लस्टरची उभारणी करण्यात येणार आहे. नागपूरमध्ये संरक्षण संबंधित निर्माण कार्य तसेच एअरोस्पेस सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. नवीन औद्योगिक धोरणामध्ये महाराष्ट्रात संरक्षण आणि एअरोस्पेस क्लस्टर उभारणीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे नागपूर येथे पहिल्या टप्प्यात उडाण कौशल्य विकास केंद्र आणि दुसऱ्या टप्प्यात निर्माण सामान्य सुविधा केंद्र याप्रमाणे दोन टप्प्यात हा क्लस्टर उभारण्यात येणार आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे बळकटीकरण
अमरावती विभागामध्ये ३०२ कोटी ८३ लक्ष रुपयांच्या निधीमधून शेततळ्यांना अस्तरीकरण करणे, छोटे गोदाम तयार करणे व शेतकऱ्यांना सोलार इलेक्ट्रीक पंप देणे तसेच पर्यटन विकास करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. फळ रोपवाटिकांमध्ये सुधारीत रोपवाटिकांची स्थापना आणि अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे बळकटीकरण करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्यात बियाणे हब तयार करण्यात येणार असल्याचे अमरावती विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

टूल बँकसाठी ६२ कोटी
शेतकऱ्यांना उपकरण उपलब्ध करून देण्यासाठी टूल बँक तयार ६२ कोटी रुपयाची तरतूद करण्यात येणार आहे. यात नागपूर विभागात ३२ व अमरावती विभागात ३० कोटी रुपयाचा खर्च होईल. नर्सरी विकासासाठी २५ कोटी रुपये खर्च होतील. गडचिरोलीतील वडसामध्ये दुग्धविकासासाठी अडीच कोटी दिले जातील. मत्स्यबिजेसाठीही तरतूद केली जाईल.

Web Title: Special program of 9 58 crore for development of Vidarbha; Anup Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.