विधानभवन परिसरातील मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी खास पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 12:19 AM2018-07-04T00:19:20+5:302018-07-04T00:20:26+5:30

नागपूर शहरात सुमारे ८० हजार बेवारस कुत्रे आहेत. रात्रीला गल्लीबोळातच नव्हे तर मुख्य रस्त्यांवर कुत्र्यांचा वावर असतो. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. विधानभवन परिसरातही मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. यामुळे अधिवेशनासाठी आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांत या कुत्र्यांची दशहत आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ वृत्त प्रकाशित करताच प्रशासन कामाला लागले. जिल्हा प्रशासनाने महापालिकेच्या पशुचिकि त्सकांना या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार विधानभवन परिसरातील मोकाट कुत्र्यांना पकडण्यासाठी खास पथक गठित करण्यात आले आहे.

Special Squad for the stray dogs in the Vidhan Bhavan area | विधानभवन परिसरातील मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी खास पथक

विधानभवन परिसरातील मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी खास पथक

Next
ठळक मुद्देप्रभाव लोकमतचा : पकडून दुसरीकडे सोडणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरात सुमारे ८० हजार बेवारस कुत्रे आहेत. रात्रीला गल्लीबोळातच नव्हे तर मुख्य रस्त्यांवर कुत्र्यांचा वावर असतो. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. विधानभवन परिसरातही मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. यामुळे अधिवेशनासाठी आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांत या कुत्र्यांची दशहत आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ वृत्त प्रकाशित करताच प्रशासन कामाला लागले. जिल्हा प्रशासनाने महापालिकेच्या पशुचिकि त्सकांना या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार विधानभवन परिसरातील मोकाट कुत्र्यांना पकडण्यासाठी खास पथक गठित करण्यात आले आहे.
विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी कायद्याच्या अडचणीमुळे मोकाट कुत्र्यांना पकडून अन्यत्र सोडता येत आहे. त्यामुळे कुत्र्यांवर नसबंदी हाच एकमेव प्रभावी उपाय आहे. मात्र नसबंदी करण्यासाठी महापालिकेकडे प्रभावी यंत्रणा नाही. शहरात ८० हजाराहून अधिक मोकाट कुत्रे असताना जेमतमेत ७ ते ८ कुत्र्यांवर नसबंदी केली जाते. नसबंदीनंतर कुत्र्यांना ठेवण्यासाठी व्यवस्था नाही. त्यामुळे हा उपक्रम राबविताना अनेक अडचणी आहेत.
मोकाट कुत्र्यामुळे रात्रीला कामावरून घरी परतणारे कुत्र्यांमुळे दहशतीत असतात. दुचाकी वाहन दिसले की कुत्रे धावतात. यामुळे अनेकदा अपघात होतात. तसेच लहान मुलांना चावण्याचा घटना वाढल्या आहेत. तसेच रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांमुळे घाण पसरते. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. याला आळा घालण्यासाठी बेवारस कुत्र्यांवर नसबंदी होण्याची गरज आहे. यासाठी दोन वर्षात अनेकदा प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. परंतु महापालिका प्रशासन व पदाधिकाºयांची उदासीनता, सक्षम यंत्रणेचा अभाव, निधीची कमतरता व नियोजनाचा अभाव यामुळे या उपक्रमाला गती मिळालेली नाही. परिणामी शहरातील नागरिकांची मोकाट कुत्र्यांच्या त्रासातून सुटका होण्याची शक्यता नाही. याचा प्रत्यय आता अधिवेशनासाठी आलेले अधिका२ी व कर्मचाºयांनाही येत आहे.

Web Title: Special Squad for the stray dogs in the Vidhan Bhavan area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.