गरोदर महिलांच्या तपासणीसाठी नागपूर मनपाची विशेष चमू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 10:59 AM2020-04-27T10:59:26+5:302020-04-27T11:00:31+5:30

लॉकडाऊनमध्ये गरोदर महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांची वेळोवेळी तपासणी व आवश्यक लसीकरण करणे गरजेचे आहे. कोविडमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. अशात गरोदर महिलांच्या संदर्भात संभाव्य धोके टाळण्यासाठी मनपाने त्यांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष रुग्णवाहिका तयार केली आहे.

Special team of Nagpur Municipal Corporation for examination of pregnant women | गरोदर महिलांच्या तपासणीसाठी नागपूर मनपाची विशेष चमू

गरोदर महिलांच्या तपासणीसाठी नागपूर मनपाची विशेष चमू

Next
ठळक मुद्देआयुक्त तुकाराम मुंढे यांची संकल्पनाविशेष रुग्णवाहिकेद्वारे रहिवासी क्षेत्रात सेवा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनमध्ये गरोदर महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांची वेळोवेळी तपासणी व आवश्यक लसीकरण करणे गरजेचे आहे. कोविडमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. अशात गरोदर महिलांच्या संदर्भात संभाव्य धोके टाळण्यासाठी मनपाने त्यांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष रुग्णवाहिका तयार केली आहे. या रुग्णवाहिकेद्वारे स्त्रीरोगतज्ज्ञ गरोदर महिलांच्या रहिवासी क्षेत्रात जाऊन त्यांची तपासणी करीत आहेत. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू केला आहे. रविवारी शहरातील मोमीनपुरा आणि सतरंजीपुरा भागामध्ये चमूद्वारे गरोदर महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
मनपाद्वारे शहरातील कोरोना संसर्गाचे हॉटस्पॉट प्रतिबंधित करण्यात आले आहेत. मनपाच्या आरोग्य विभागामार्फत या प्रतिबंधित क्षेत्रातील अतिधोकादायक गटातील व्यक्ती शोधण्यात आल्या आहेत. याचाच पुढचा भाग म्हणून या ठिकाणच्या गरोदर महिला शोधून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे तपासणीसाठी या महिलांना कोणत्याही रुग्णालयात जाण्याची गरज नाही. त्या राहत असलेल्या ठिकाणी मनपाची चमू येईल व स्त्रीरोगतज्ज्ञांमार्फत आवश्यक त्या सर्व तपासणी केल्या जातील. गरोदर महिलांची रक्त, लघवी तपासणी किंवा लसीकरण आणि आवश्यक औषधोपचार या सर्व सुविधा मनपाद्वारे घरपोच देण्यात येत आहेत. रविवारी सतरंजीपुरा आणि मोमीनपुरा भागात जाऊन येथील गरोदर महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. जन्माला येणाऱ्या बाळाला कोणताही धोका राहू नये, आई आणि बाळाचे आरोग्य चांगले राहावे, या उद्देशाने मनपाद्वारे ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. संसर्ग टाळण्यासाठी अत्यंत सुरक्षितरीत्या ही चाचणी केली जात आहे. आई आणि होणाºया बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने ही चाचणी होणे आवश्यक आहे. स्वत:ला आणि येणाºया बाळाचे आरोग्य चांगले राहावे यासाठी शहरातील सर्व ठिकाणच्या महिलांनी तपासणीसाठी पुढे यावे व मनपाच्या आरोग्य चमूला सहकार्य करावे, असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी केले आहे.


आरोग्य तपासणीसह घेणार ‘स्वॅब’
गरोदर महिलांचे संभाव्य धोके टाळण्यासाठी त्यांच्या आरोग्य तपासणीसह त्यांचा कोरोना चाचणीसाठी स्वॅबही घेण्यात येणार आहे. यासाठी महिलांना विलगीकरण कक्षात राहण्याची गरज नाही. स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह राहिल्यास त्यांना कुठेही जाण्याची गरज नाही. मात्र स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करून तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत त्यांच्यावर उपचार केले जातील. अत्यंत सुरक्षितरीत्या हे स्वॅब घेण्यात येते. रुग्णवाहिकेमध्ये कोरोना स्वॅब घेण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. स्वॅब घेणारे डॉक्टरचे फक्त दोन्ही हात बाहेर येतात व चाचणी केली जाते.

 

Web Title: Special team of Nagpur Municipal Corporation for examination of pregnant women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.