नागपूर-कोल्हापूरदरम्यान विशेष रेल्वेगाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:08 AM2021-02-27T04:08:01+5:302021-02-27T04:08:01+5:30

नागपूर : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहून रेल्वे प्रशासनाने नागपूर-कोल्हापूर दरम्यान विशेष रेल्वेगाडी सुरु करण्याचा निर्णय घेतला असून ही गाडी ...

Special train between Nagpur-Kolhapur | नागपूर-कोल्हापूरदरम्यान विशेष रेल्वेगाडी

नागपूर-कोल्हापूरदरम्यान विशेष रेल्वेगाडी

Next

नागपूर : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहून रेल्वे प्रशासनाने नागपूर-कोल्हापूर दरम्यान विशेष रेल्वेगाडी सुरु करण्याचा निर्णय घेतला असून ही गाडी आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे.

रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०१४०४ छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर-नागपूर विशेष रेल्वेगाडी प्रत्येक सोमवार आणि शुक्रवारी १२ मार्चपासून पुढील आदेश मिळेपर्यंत दुपारी १२.४५ वाजता सुटेल. ही गाडी धामणगावला सकाळी ९.२९, पुलगाव ९.४८, वर्धा १०.२०, अजनी ११.२३ आणि नागपूरला दुपारी १२ वाजता पोहोचेल. रेल्वेगाडी क्रमांक ०१४०३ नागपूर-छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर विशेष रेल्वेगाडी १३ मार्चपासून पुढील आदेश मिळेपर्यंत दुपारी ३.१५ वाजता सुटेल. ही गाडी अजनीला दुपारी ३.२३, वर्धा ४.१३, पुलगाव ४.३६, धामणगाव ४.५७ आणि कोल्हापूरला दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजता पोहोचेल. दोन्ही गाड्यांना मिरज, सांगोला, पंढरपूर, कुरदुवाडी, बरसी टाऊन, उस्मानाबाद, लातूर, परळी वैजनाथ, परभणी, पूर्णा, हिंगोली, वाशिम, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, अजनी येथे थांबा देण्यात आला आहे. दोन्ही गाड्यात १ एसी टू टायर, ३ एसी थ्री टायर, १० स्लिपर, ५ सेकंड क्लास सीटिंग कोच राहणार आहेत. या गाड्यांचे आरक्षण १ मार्च २०२१ पासून सुरू होणार आहे.

...............

Web Title: Special train between Nagpur-Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.