नांदेड व संतरागाछी दरम्यान विशेष ट्रेन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:08 AM2021-03-20T04:08:00+5:302021-03-20T04:08:00+5:30
नागपूर : रेल्वे प्रशासनाने नांदेड आणि संतरागाछी दरम्यान नागपूरमार्गे धावणारी विशेष ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ०२७६७ ...
नागपूर : रेल्वे प्रशासनाने नांदेड आणि संतरागाछी दरम्यान नागपूरमार्गे धावणारी विशेष ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ०२७६७ नांदेड-संतरागाछी व्हाया नागपूर विशेष गाडी ५ एप्रिलपासून सुरू हाेणार. ही गाडी प्रत्येक साेमवारी नांदेडहून दुपारी ३.२५ वाजता रवाना हाेऊन दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७.२० वाजता संतरागाछी पाेहचेल. याप्रमाणेच ०२७६८ संतरागाछी-नांदेड स्पेशल व्हाया नागपूर ७ एप्रिलपासून पुढची सूचना मिळेपर्यंत प्रत्येक बुधवारी दुपारी २.४५ वाजता संतरागाछीहून रवाना हाेत दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७.१० वाजता नांदेडला पाेहचेल. ही गाडी मुदखेड, हिमायतनगर, किनवट, आदिलाबाद, पिंपळकुटी, वणी, माजरी, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगड़ा, राऊरकेला, चक्रधरपूर, टाटानगर हाेत खड़गपूरला थांबेल. या गाडीत दाेन एसी थ्री टायर, ९ स्लीपर क्लास, ६ सेकंड क्लास सीटिंग काेच आणि एक पेंट्रीकार असेल. या ट्रेनमध्ये तिकीट कन्फर्म असलेल्या प्रवाशांनाच प्रवेश दिला जाईल. प्रवाशांना प्रवासादरम्यान काेराेना नियमांचे कठाेरतेने पालन करावे लागेल.