प्रयागराज-यशवंतपूर दरम्यान विशेष रेल्वेगाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 01:05 PM2020-10-24T13:05:11+5:302020-10-24T13:05:41+5:30

Indian Railway Nagpur News प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि वाढलेली प्रतीक्षा यादी पाहून रेल्वे प्रशासनाने प्रयागराज-यशवंतपूर-प्रयागराज दरम्यान फेस्टिव्हल स्पेशल रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

Special train between Prayagraj-Yesvantpur | प्रयागराज-यशवंतपूर दरम्यान विशेष रेल्वेगाडी

प्रयागराज-यशवंतपूर दरम्यान विशेष रेल्वेगाडी

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि वाढलेली प्रतीक्षा यादी पाहून रेल्वे प्रशासनाने प्रयागराज-यशवंतपूर-प्रयागराज दरम्यान फेस्टिव्हल स्पेशल रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेगाडी क्रमांक ०४१३३ प्रयागराज-यशवंतपूर साप्ताहिक फेस्टिव्हल स्पेशल प्रत्येक रविवारी (२५ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबर) धावणार आहे. ही गाडी नागपुरात दुसऱ्या दिवशी दुपारी ३.५० वाजता येऊन ३.५५ वाजता रवाना होईल. रेल्वेगाडी क्रमांक ०४१३४ यशवंतपूर-प्रयागराज साप्ताहिक फेस्टिव्हल स्पेशल प्रत्येक बुधवारी (२८ ऑक्टोबर ते २ डिसेंबर) सुटेल. ही गाडी नागपूरला दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३० वाजता येऊन ७.३५ वाजता रवाना होईल. या गाड्यात एकूण २४ कोच राहतील. यात १ एसी फर्स्ट, २ एसी टु टायर, ६ एसी थ्री टायर, ८ स्लिपर, ४ साधारण द्वितीय श्रेणी, १ प्रथम श्रेणीसह द्वितीय श्रेणी वातानुकूलित आणि २ एसएलआर कोचचा समावेश आहे. या गाड्यांमध्ये केवळ आरक्षित कोच राहणार असून कन्फर्म तिकीट असलेले प्रवासीच प्रवास करू शकणार आहेत.

Web Title: Special train between Prayagraj-Yesvantpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.