नागपूरहून गोव्यासाठी स्पेशल ‘ट्रेन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:10 AM2021-08-29T04:10:15+5:302021-08-29T04:10:15+5:30

रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०१२५५ साप्ताहिक फेस्टिव्हल स्पेशल ४ आणि ११ सप्टेंबरला शनिवारी नागपूरवरून दुपारी ३.५० वाजता ...

Special train from Nagpur to Goa | नागपूरहून गोव्यासाठी स्पेशल ‘ट्रेन’

नागपूरहून गोव्यासाठी स्पेशल ‘ट्रेन’

Next

रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०१२५५ साप्ताहिक फेस्टिव्हल स्पेशल ४ आणि ११ सप्टेंबरला शनिवारी नागपूरवरून दुपारी ३.५० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी करमालीला दुपारी २.१५ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात रेल्वेगाडी क्रमांक ०१२५६ साप्ताहिक फेस्टिव्हल स्पेशल ५ आणि १२ सप्टेंबरला रविवारी करमालीवरून रात्री ८.४० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी नागपूरला रात्री ८.१० वाजता पोहोचेल. रेल्वेगाडी क्रमांक ०१२५६ वर्धा, अकोला, शेगांव, भुसावळ, नासिक रोड, कल्याण, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, सावंतवाडी आणि थिविमला थांबणार आहे. तर रेल्वेगाडी क्रमांक ०१२५५ नागपूर-करमाळी वर्धा, अकोला, शेगांव, भुसावळ, नासिक रोड, कल्याण, पनवेल, मानगाव, वीर, खेड, चिपळूण, सवरदा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी, नंदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आणि थिविमला थांबणार आहे. दोन्ही गाड्यात एक एसी टु टायर, चार एसी थ्री टायर, ११ स्लिपर आणि सहा द्वितीय श्रेणी सिटींग कोच राहणार आहेत.

............

Web Title: Special train from Nagpur to Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.