नागपूरहून मुंबई व गोवाकरिता विशेष रेल्वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 11:17 PM2018-12-11T23:17:25+5:302018-12-11T23:19:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : हिवाळ्यात रेल्वेत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी आणि लांब प्रतीक्षा यादी पाहता रेल्वे प्रशासनाने अजनी-थिवीम-अजनी या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हिवाळ्यात रेल्वेत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी आणि लांब प्रतीक्षा यादी पाहता रेल्वे प्रशासनाने अजनी-थिवीम-अजनी या दरम्यान वर्धा, पुलगांव आणि धामणगाव या मार्गावर साप्ताहिक विंटर स्पेशल रेल्वेच्या सहा फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय नागपूर-मुंबईदरम्यान सहा फेºया राहणार आहेत.
या अंतर्गत ०११९ अजनी-थिवीम विंटर स्पेशल रेल्वे अजनी येथून प्रत्येक सोमवारी (२४ डिसेंबर ते ७ जानेवारीपर्यंत) सायंकाळी ७.५० वाजता रवाना होऊन मंगळवारी रात्री ८.३० वाजता थिवीम येथे पोहचेल. विशेष रेल्वे सोमवारी वर्धा येथे रात्री ८.५० ला पोहोचून ८.५३ मिनिटांनी सुटेल. तसेच पुलगांव येथे रात्री ९.१६ वाजता पोहोचून ९.१८ वाजता प्रस्थान आणि धामणगांव येथे रात्री ९.३५ वाजता पोहोचून ९.३६ वाजता सुटणार आहे.
याचप्रकारे ०११२० थिवीम-अजनी विंटर स्पेशल रेल्वे थिवीम येथून प्रत्येक मंगळवारी (२५ डिसेंबर ते ८ जानेवारीपर्यंत ) रात्री ११ वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी बुधवारी नागपुरात रात्री १०.५० वाजता पोहोचणार आहे. विशेष रेल्वे प्रत्येक बुधवारला धामणगांव येथे रात्री ८.४८ वाजता पोहोचून ८.५० ला प्रस्थान, पुलगांव येथे रात्री ९.०८ वाजता पोहोचून ९.१० वाजता प्रस्थान आणि वर्धा येथे रात्री ९.४० ला पोहोचून ९.४३ ला सुटणार आहे.
विशेष रेल्वे वर्धा, पुलगांव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि कुडाळ येथे थांबणार आहे. रेल्वेत एक एसी-२, एक एसी-३, १२ शयनयान, दोन द्वितीय साधारण आणि दोन एसएलआरसह १८ कोच राहणार आहेत.
नागपूर-मुंबई-नागपूर विशेष रेल्वे
विशेष रेल्वे नागपूर-मुंबई-नागपूर अशीही धावणार आहे. याअंतर्गत ०२०३२ नागपूर-मुुंबई विशेष विंटर रेल्वे नागपूर येथून प्रत्येक रविवारी (२३ डिसेंबर ते ६ जानेवारीपर्यंत) दुपारी ३ वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी ६.१० वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे पोहचेल. याचप्रकारे ०२०३१ मुंबई-नागपूर रेल्वे मुंबईहून प्रत्येक शनिवारी (२२ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत) रात्री १२.२० वाजता रवाना होऊन त्याचदिवशी दुपारी १.५५ वाजता नागपुरात येणार आहे. रेल्वे दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक, मनमाड, जळगांव, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, बडनेरा, धामणगांव, पुलगांव, वर्धा येथे थांबेल. रेल्वेत १३ एसी-३, दोन एसएलआरसह एकूण १५ एलएचबी कोच राहतील.