होळीनिमित्त नागपूरहून मुंबई-पुण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 11:58 AM2020-02-27T11:58:39+5:302020-02-27T11:59:27+5:30
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची वाढलेली प्रतीक्षायादी आणि होळीनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंबई व पुण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची वाढलेली प्रतीक्षायादी आणि होळीनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंबई व पुण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वेगाडी क्रमांक ०२०३२/०२०३१ नागपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस-नागपूर दरम्यान २ विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०२०३२ नागपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष रेल्वेगाडी गुरुवारी १२ मार्चला सायंकाळी ५.५० वाजता सुटेल. ही गाडी वर्धाला ७.०७, बडनेरा ८.४२, अकोला ९.४२, शेगाव रात्री १०.०३, मलकापूर १०.४३ आणि लोकमान्य टिळक टर्मिनसला दुसऱ्या दिवाशी शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात रेल्वेगाडी क्रमांक ०२०३१ लोकमान्य टिळक टर्मिनस-नागपूर विशेष रेल्वेगाडी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून बुधवारी ११ मार्चला रात्री १२.४५ वाजता सुटेल. ही गाडी शेगावला सकाळी ९.०८, अकोला ९.२३, बडनेरा ११.०३, वर्धा दुपारी १२.२८ आणि नागपूरला २.१० वाजता पोहोचेल. दोन्ही गाड्यात एकूण २३ कोच आहेत. यात ३ तृतीय वातानुकूलित, १ द्वितीय वातानुकूलित, १४ स्लिपर, ३ साधारण द्वितीय आणि २ एसएलआर कोचचा समावेश आहे.
नागपूर-पुणे-नागपूर दरम्यानरेल्वेगाडी क्रमांक ०१४१६/०२४४७ दोन विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येतील. रेल्वेगाडी क्रमांक ०१४१६ नागपूर-पुणे विशेष रेल्वेगाडी शनिवारी १४ मार्चला नागपूरवरून सकाळी ९.२० वाजता सुटेल. ही गाडी वर्धाला १०.५०, बडनेरा १२.४०, अकोला दुपारी १.३८, भुसावळ सायंकाळी ५.२५, मनमाड ७.४५, कोपरगाव ८.५३ आणि पुण्याला दुसºया दिवशी पहाटे ४.०५ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात रेल्वेगाडी क्रमांक ०२०४७ पुणे-नागपूर विशेष रेल्वेगाडी पुण्यावरून शुक्रवारी १३ मार्चला सकाळी १०.४५ वाजता सुटेल. ही गाडी कोपरगावला दुपारी ३.५८, मनमाडला सायंकाळी ५.२०, भुसावळ ७.५०, अकोला ९.४७, बडनेरा रात्री ११.०७, वर्धाला रात्री १२.३२ आणि नागपूरला रात्री २ वाजता पोहोचेल. दोन्ही गाड्यात एकूण २३ कोच आहेत. यात ३ तृतीय वातानुकूलित, १ द्वितीय वातानुकूलित, १४ स्लिपर, ३ साधारण द्वितीय श्रेणी आणि २ एसएलआर कोचचा समावेश आहे.