कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी विशेष लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:08 AM2021-06-09T04:08:26+5:302021-06-09T04:08:26+5:30
नागपूर : कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय असल्यामुळे कोविड लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर ...
नागपूर : कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय असल्यामुळे कोविड लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल येथे कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी विशेष लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली असून कॅन्सरग्रस्त नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी म्हटले आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हॉस्पिटल येथे कॅन्सरग्रस्त असलेल्या नागरिकांना लस देण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून लसीकरण सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. लसीकरणासाठी नागरिकांनी स्वत:चे आधार कार्ड व वैद्यकीय दाखला सोबत आणल्यास तात्काळ लसीकरण करण्यात येईल. लसीकरणासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हॉस्पिटल येथे सुरु करण्यात आलेल्या सुविधेचा लाभ घ्यावा असे कळविण्यात आले आहे. अधिक संपर्कासाठी कॅन्सर हॉस्पिटल येथेही संपर्क साधता येईल.