आज महिलांसाठी विशेष लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:08 AM2021-09-21T04:08:42+5:302021-09-21T04:08:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या संक्रमणाची साखळी खंडित करण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरणावर भर देण्यात येत आहे. याच श्रृखंलेमध्ये ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या संक्रमणाची साखळी खंडित करण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरणावर भर देण्यात येत आहे. याच श्रृखंलेमध्ये आता महिलांसाठी लसीकरणाची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. २१ सप्टेंबर रोजी शहरातील महिलांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील ३३० केंद्रांवर महिलांचे लसीकरण केले जाणार आहे. या विशेष लसीकरण मोहिमेमध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त महिलांनी लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण अभियानांतर्गत शहरातील १६० केंद्रांवर नियमित लसीकरण सुरू असून, ग्रामीण भागातील १७० केंद्रांवर लसीकरण होणार आहे. या अभियानामध्ये महिला मागे राहू नयेत. या उद्देशाने शहरामध्ये विशेष ‘महिला लसीकरण दिवस’ साजरा करण्यात येत आहे. या विशेष मोहिमेमध्ये प्रत्येक महिलेने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विमला आर. यांनी केले आहे.