मेट्रो रेल्वेच्या बांधकामाचा वेग वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 01:20 AM2017-11-02T01:20:07+5:302017-11-02T01:20:17+5:30

एअरपोर्ट साऊथ मेट्रो स्टेशन ते मिहान डेपोपर्यंत ५.६ कि़मी. जमिनीवरून धावणाºया मेट्रो रेल्वेचे आणि त्या दरम्यान उभ्या राहणाºया तीन स्टेशनचे बांधकाम वेगात सुरू आहे.

The speed of construction of the metro rail has increased | मेट्रो रेल्वेच्या बांधकामाचा वेग वाढला

मेट्रो रेल्वेच्या बांधकामाचा वेग वाढला

Next
ठळक मुद्देबृजेश दीक्षित यांनी केली कामाची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एअरपोर्ट साऊथ मेट्रो स्टेशन ते मिहान डेपोपर्यंत ५.६ कि़मी. जमिनीवरून धावणाºया मेट्रो रेल्वेचे आणि त्या दरम्यान उभ्या राहणाºया तीन स्टेशनचे बांधकाम वेगात सुरू आहे. बुधवारी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांच्यासोबत मेट्रो रेल्वेच्या पाहणी दौºयात बांधकामाची प्र्रचिती आली.
पत्रकारांशी संवाद साधताना दीक्षित यांनी प्रत्येक स्टेशन अनोख्या कलाकृतीचा नमुना असल्याचे सांगितले. मेट्रोच्या सर्व स्टेशनचे छत सोलरचे राहणार आहे. जमिनीवरील तिन्ही स्टेशनचे ५० टक्के बांधकाम झाले आहे. एअरपोर्ट साऊथ मेट्रो स्टेशनमध्ये आॅपटीम ग्लासचा उपयोग करण्यात येणार असून ती पारदर्शक राहील. स्टेशनवरील मोठ्या हॉलचा उपयोग लग्नसमारंभ आणि कार्यक्रमासाठी होणार आहे. पार्किंगची भरपूर व्यवस्था आहे. शिवाय मध्य रेल्वेच्या रूळाबाजूची जागा महामेट्रोने पार्किंगसाठी मागितली आहे.
न्यू एअरपोर्ट इंडो सारसेनिक शैलीतील मेट्रो स्टेशन उत्कृष्ट स्थापत्यकलेचा नमुना राहणार आहे. दिव्यांगासाठी वेगळी व्यवस्था राहील. वर्धा रोड ते विमानतळाला जोडणाºया अप्रोच रस्त्यालगत राहणार आहे. या स्टेशनपासून विमानतळापर्यंत स्कायवॉक, एफओबी अथवा ट्रॅव्हलेटर बनविण्याची योजना आहे. खापरी मेट्रो रेल्वे स्टेशन व्हिक्टोरिया आर्किटेक्चरचा एक नमुना असून ७० मीटर लांबीचा प्लॉटफॉर्म राहील. या स्टेशनमुळे नागपूर रेल्वेत जागतिक दर्जाच्या बांधकामाचे प्रतिबिंब दिसणार आहे.
दौºयात महामेट्रोचे संचालक (प्रकल्प) महेश कुमार अग्रवाल, संचालक (रोलिंग स्टॉक) सुनील माथूर, संचालक (वित्त) एस. शिवमाथन आणि महाव्यवस्थापक (वित्त) अनिल कोकाटे उपस्थित होते.

आतापर्यंत २४९० कोटींचा खर्च
मेट्रो प्रकल्पाला मनपा आणि नासुप्रकडून आतापर्यंत मिळालेली जमिनीची किंमत आणि झालेले बांधकाम व तांत्रिक कामांवर ३० सप्टेंबरपर्यंत २४९० कोटींचा खर्च झालेला आहे. प्रकल्पाला जर्मन सरकारच्या विकास बँकेने ३७०० कोटी व वाढीव ४४० कोटी आणि फ्रान्सच्या एएफडी वित्तसंस्थेने जवळपास १००० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. मेट्रोच्या चार मार्गावर सुरू असलेल्या विकास कामांच्या खर्चात राज्य आणि केंद्र सरकारचा समान वाटा आहे, तर तांत्रिक कामांसाठी आणि भविष्यातील कामांसाठी विदेशी वित्तसंस्थांतर्फे वेळोवेळी निधी मिळत आहे. प्रकल्पाचे मूल्य ८६८० कोटी रुपये आहे.
आरडीएसओची चमू येणार
मेट्रोला तांत्रिक प्रमाणपत्रासाठी रिसर्च डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड स्टॅण्डर्ड आॅर्गनायझेशनचे (आरडीएसओ) कार्यकारी संचालक राजेश कुमार आणि दोन अधिकाºयांची चमू पुन्हा येणार आहे. पूर्वी त्यांनी निरीक्षण करून अहवाल दिला आहे. त्यानंतर मेट्रोच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारच्या सिव्हिल एव्हिएशनअंतर्गत कार्यरत कमिशनर मेट्रो रेल्वे सेफ्टीची (सीएमआरएस) चमू येणार आहे. दोन्ही विभागाच्या अहवालावर रेल्वे बोर्डाकडून ना-हरकत प्रमाणपत्र मिळेल.
दुसºया टप्प्यात ५७ कि़मी.चा विस्तार
पहिल्या टप्प्याचे बांधकाम वेगात सुरू असतानाच दुसºया टप्प्याच्या बांधकामाची आखणी महामेट्रोने ९ महिन्यांपूर्वीच सुरू केली आहे. मेट्रोचे नवीन धोरण आल्यानंतर महामेट्रोतर्फे नवीन डीपीआर तयार करण्यात येत आहे. तीन महिन्यात राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार आहे. नंतर तो केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल. संसदेत गेल्यानंतर मेट्रो बजेटमध्ये त्याचा समावेश होईल. पहिल्या टप्प्यात नागपुरात पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण ३८.५ कि़मी. मेट्रोची कामे सुरू आहेत. विस्तारित दुसºया टप्प्यात ५७ कि़मी.चा समावेश राहील. कापसी, हिंगणा टाऊन, बुटीबोरी आणि वासुदेवनगर ते वाडीपर्यंत विस्तारित स्वरूप राहणार आहे.

Web Title: The speed of construction of the metro rail has increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.