द्रुतगती महामार्गावर वेगावर नियंत्रण, शंभूराज देसाई यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 06:48 AM2022-12-23T06:48:33+5:302022-12-23T06:48:51+5:30

रस्ते सुरक्षेसंदर्भात सुधारित धोरण यापूर्वीच तयार करण्यात आले असल्याची माहिती.

Speed control on mumbai pune expressways information by Sambhuraj Desai maharashtra | द्रुतगती महामार्गावर वेगावर नियंत्रण, शंभूराज देसाई यांची माहिती

द्रुतगती महामार्गावर वेगावर नियंत्रण, शंभूराज देसाई यांची माहिती

Next

 नागपूर : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्यासंदर्भात संबंधित यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत. वेगावर नियंत्रण, लेन कटिंग टाळणे, अवजड वाहनांनी नियम पाळणे व पेट्रोलिंगसह सुरक्षित पार्किंग या बाबींकडे लक्ष देण्यात येईल, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. विधानसभा सदस्य लक्ष्मण जगताप व भीमराव तापकीर यांनी  उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तर देताना मंत्री देसाई बोलत होते.

ते म्हणाले, रस्ते सुरक्षेसंदर्भात सुधारित धोरण यापूर्वीच तयार करण्यात आले आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परिवहन विभाग, पोलिस, महामार्ग पोलिस, राष्ट्रीय रस्ते विकास यंत्रणा यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १७ ऑक्टोबर २०२२ रोजी बैठक घेऊन यंत्रणेला यासंदर्भात निर्देश दिले असल्याची माहिती मंत्री देसाई यांनी दिली. 

या महामार्गावर अपघात टाळण्यासाठी जे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे सन २०१६ पासून अपघात संख्या आणि अपघातामुळे होणारे मृत्यू यात घट होत असल्याचे दिसून येत आहे, असेही देसाई यांनी सांगितले.

Web Title: Speed control on mumbai pune expressways information by Sambhuraj Desai maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.