गोरेवाडा खोलीकरणाच्या कामाला गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 10:31 PM2019-06-25T22:31:06+5:302019-06-25T22:33:05+5:30
महापालिकेने गोरेवाडा तलाव खोलीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. या कामातील अडथळे दूर करून काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे गोरेवाडा येथील परिस्थितीची दरोराज पाहणी करून आढावा घेत आहेत. मंगळवारी पुन्हा पाहणी करून त्यांनी आढावा घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :महापालिकेने गोरेवाडा तलाव खोलीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. या कामातील अडथळे दूर करून काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे गोरेवाडा येथील परिस्थितीची दरोराज पाहणी करून आढावा घेत आहेत. मंगळवारी पुन्हा पाहणी करून त्यांनी आढावा घेतला. यावेळी मनोज अग्रवाल, हर्षद घाटोळे, भूषण इंगळे, शशी माहेश्वरी, दीपक चांदेकर आदी उपस्थित होते.
मागील शंभर वर्षात पहिल्यांदाच ओढवलेल्या परिस्थितीवर मनपाने पुढाकार घेतल्यानंतर मागील सहा दिवसांपासून गोरेवाडा तलावाच्या खोलीकरणाचे काम सुरू आहे. या खोलीकरण कार्यामध्ये सुमारे तीन फुटापर्यंत माती काढण्यात आल्यानंतर तलावाला पाणी लागले. त्यामुळे खोलीकरणाच्या कामाला यश मिळत असल्याने या कामाची गती वाढविण्यात आली. यासाठी महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून प्राधान्याने काम केले जात आहे. कामाचा वेळावेळी आढावा घतला जात आहे. खोलीकरणाच्या कामामध्ये चार पोकलेन व १० टिप्पर कार्यरत आहेत. नागनदी स्वच्छता कार्य पूर्ण होताच या कार्यामध्ये असलेले सर्व पोकलेन व टिप्पर गोरेवाडा तलावावर स्थानांतरित करून काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश प्रदीप पोहाणे यांनी दिले.