नागपुरात पट्टेवाटप व नियमितीकरणाला गती देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 02:14 PM2018-03-12T14:14:40+5:302018-03-12T14:14:54+5:30

नासुप्रच्या माध्यमातून अनधिकृत ले-आऊ टचे नियमितीकरण व शहरातील झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटपाच्या कामाला गती देण्याची ग्वाही महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष व नासुप्रचे विश्वस्त विरेंद्र कुकरेजा यांनी सोमवारी दिली.

Speed ​​up leage and regularigation in Nagpur | नागपुरात पट्टेवाटप व नियमितीकरणाला गती देणार

नागपुरात पट्टेवाटप व नियमितीकरणाला गती देणार

googlenewsNext
ठळक मुद्देविरेंद्र कुकरेजा यांची ग्वाही : नासुप्र विश्वस्त पदाची सूत्रे स्विकारली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नासुप्रच्या माध्यमातून अनधिकृत ले-आऊ टचे नियमितीकरण व शहरातील झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटपाच्या कामाला गती देण्याची ग्वाही महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष व नासुप्रचे विश्वस्त विरेंद्र कुकरेजा यांनी सोमवारी दिली. नासुप्रच्या विश्वस्तपदाचा पदभार स्विकारताना ते बोलत होते. यावेळी भाजपाचे शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे  , प्रा. अनिल सोले, डॉ. मिलींद माने, महापालिकेतील सत्तापक्षनेते संदीप जोशी, नासुप्रचे विश्वस्त भूषण शिंगणे आदी उपस्थित होते.
पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन विकासाला गती देण्याचा प्रयत्न करू. नासुप्रच्या माध्यमातून शहरातील झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे वाटपासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या शहर विकासाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची ग्वाही कुकरेजा यांनी दिली.
कुकरेजा यांच्या माध्यमातून नासुप्रची प्रलंबित कामे मार्गी लागतील अशी अपेक्षा सुधाकर कोहळे यांनी व्यक्त केला. विश्वस्तपदाच्या माध्यमातून शहरातील गरीब लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. याचा सदुपयोग करावा. दोन्ही विश्वस्त शहर विकासाला गती देतील असा विश्वास अनिल सोले यांनी व्यक्त के ला. तर डॉ. मिलींद माने यांनी उत्तर नागपुरातील प्रलंबित कामे मार्गी लागतील अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी महापालिकेतील पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.

Web Title: Speed ​​up leage and regularigation in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.