नागपूर शहरातील प्रकल्पांना गती द्या : नितीन गडकरी यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 01:14 AM2019-01-31T01:14:52+5:302019-01-31T01:16:31+5:30

नागपूर शहरातील सर्व निर्माणाधीन प्रकल्पांच्या कामाचा वेग वाढवून तातडीने पूर्ण करा, तसेच प्रस्तावित प्रकल्पांची प्रशासकीय पूर्तता करून त्या कामांच्या निविदा काढण्याचे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. शासनाच्या विविध विभागांतर्गत नागपूर शहरात सुरू असलेल्या, प्रस्तावित आणि निर्माणाधीन प्रकल्पांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी गडकरी यांच्या निवासस्थानी बुधवारी आढावा बैठक घेण्यात आली.

Speed up the projects in the city of Nagpur: Nitin Gadkari directed | नागपूर शहरातील प्रकल्पांना गती द्या : नितीन गडकरी यांचे निर्देश

नागपूर शहरातील प्रकल्पांना गती द्या : नितीन गडकरी यांचे निर्देश

Next
ठळक मुद्देविविध प्रकल्पांचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरातील सर्व निर्माणाधीन प्रकल्पांच्या कामाचा वेग वाढवून तातडीने पूर्ण करा, तसेच प्रस्तावित प्रकल्पांची प्रशासकीय पूर्तता करून त्या कामांच्या निविदा काढण्याचे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. शासनाच्या विविध विभागांतर्गत नागपूर शहरात सुरू असलेल्या, प्रस्तावित आणि निर्माणाधीन प्रकल्पांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी गडकरी यांच्या निवासस्थानी बुधवारी आढावा बैठक घेण्यात आली.
बैठकीला महापौर नंदा जिचकार, स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा, माजी महापौर प्रवीण दटके, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मनपा आयुक्त अभिजित बांगर, नासुप्र सभापती शीतल उगले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार आदी उपस्थित होते.
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सुमारे पाच हजार गाळ्यांचे बांधकाम पूर्ण झाले असून वाटपासाठी तयार आहेत, अशी माहिती शीतल उगले यांनी दिली. योजनेंतर्गत आलेल्या अर्जांची सोडत काढण्यात यावी. अपूर्ण अर्जांमधील त्रुटी दूर करून, आवश्यक बाबींची पूर्तता करून त्या अर्जांचाही सोडतीत समावेश करण्याचे निर्देश नितीन गडकरी यांनी दिले.
अंबाझरी येथील खुल्या रंगमंचासाठी (हॅम्पी थिएटर) आवश्यक २३ एकर जागेपैकी साडेसात एकर जागेचा ताबा नासुप्रला मिळाला असल्याची माहिती उगले यांनी दिली. उर्वरित जागेसंदर्भात जिल्हाधिकारी आणि नासुप्र सभापतींनी तातडीने विद्यापीठ कुलगुरूंशी बैठक घ्यावी व ती जागा ताब्यात घ्यावी. त्या जागेवर सुरक्षा भिंत करून शक्य तितक्या लवकर पुढील प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले.
केळीबाग रोड, जुना भंडारा रोड, गड्डीगोदाम, पारडी, सोमलवाडा, रामजी पहेलवान मार्गासाठी जागा उपलब्ध करून देण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला संमतीपत्र देण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. गड्डीगोदाम आणि पारडी रस्त्यांबाबतची कार्यवाही १ फेब्रुवारी रोजी, जुना भंडारा रोड, केळीबाग रोड, रामजी पहेलवान रस्त्याबाबतची कार्यवाही ६ फेब्रुवारी रोजी तर गड्डीगोदाम, सोमलवाडा रस्त्यांबाबतची कार्यवाही १६ फेब्रुवारी रोजी सुरू करा. सक्करदरा येथील बुधवार बाजाराचे अंतिम डिझाईन सात दिवसांत तयार करून त्याच्याही निविदा काढण्याचे निर्देश त्यांनी दिले.
मेमोरियलचा नवीन प्रस्ताव तयार करा
यशवंत स्टेडियम येथील प्रस्तावित डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियलसंदर्भात सूचनांसह नवीन प्रस्ताव तयार करण्यात यावा. स्थायी समिती अध्यक्ष, जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांनी त्याला अंतिम स्वरूप देऊन तो राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्याचे निर्देशही गडकरी यांनी दिले. नागपूर मेट्रो रेल्वेतर्फे पाटणी चौकापर्यंत बांधण्यात येणाऱ्या डबल डेकर पुलाच्या लॅण्डींगमधील तांत्रिक आणि वाहतुकीच्या दृष्टीने व्यवहार्यता तपासण्यात यावी व त्यानंतरच त्याबाबत योग्य निर्णय घेण्यात यावा. अजनी पूल ते वर्धा रोडला जोडणाऱ्या कारागृह परिसरातून जाणाऱ्या रस्त्याचे लोकार्पण शक्यतो २२ फेब्रुवारी दरम्यान करण्याचे निर्देश गडकरी यांनी दिले.
विद्यार्थ्यांसाठी १० कोटींचे विज्ञान केंद्र
नागपूर महानगरपालिकेचे विद्यार्थी अपूर्व विज्ञान मेळाव्याच्या माध्यमातून अतिशय सुंदर नावीन्यपूर्ण मॉडेल तयार करतात. त्यांच्या कल्पनांना प्रोत्साहन मिळावे यासाठी मनपाच्या एखाद्या बंद शाळेच्या जागेवर सुंदर इमारत करून विज्ञान केंद्र विकसित करण्यात यावे. यामुळे शहरातील विद्यार्थी वैज्ञानिकांना वाव मिळेल, अशी सूचना प्रवीण दटके यांनी केली. त्यानुसार राहतेकर वाडी येथील शाळेच्या जागेवर ही इमारत उभारण्यासाठी १० कोटींचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश गडकरी यांनी दिले.
खेळाच्या मैदानांचा विकास
नागपूर सुधार प्रन्यास अंतर्गत खेळाच्या मैदानांचा विकास करण्याकरिता ६० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या मैदानांसाठी जिल्हाधिकऱ्यातर्फे लाल मुरुम घेऊन त्यावर टाकण्यात यावा. नासुप्रने तयार केलेल्या कमी क्षमतेच्या सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्पातील पाणी टँकरद्वारे या मैदानांवर टाकण्यात यावे. काही पाणी निमार्णाधीन इमारतींना व्यावसायिक स्वरूपात देण्यात यावे. यासाठी आवश्यक किमान १५ ते २० टँकर नासुप्रने खरेदी करण्याचे निर्देश दिले.

Web Title: Speed up the projects in the city of Nagpur: Nitin Gadkari directed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.