भरधाव कार कंटेनरवर आदळली : दोघांचा मृत्यू, तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 10:13 PM2019-07-27T22:13:28+5:302019-07-27T22:14:15+5:30

भरधाव कारवरील मद्यधुंद चालकाचा ताबा सुटला आणि कारने पादचाऱ्यास धडक दिली. त्यानंतर ती कार दुभाजक ओलांडून कंटेनरच्या मागच्या भागावर आदळली. यात दोघांचा मृत्यू झाला असून, तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना देवलापार (ता. रामटेक) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर - जलपूर महामार्गावरील बांद्रा शिवारात शनिवारी सायंकाळी घडली.

Speedy car hit container: Two killed, three injured | भरधाव कार कंटेनरवर आदळली : दोघांचा मृत्यू, तिघे जखमी

भरधाव कार कंटेनरवर आदळली : दोघांचा मृत्यू, तिघे जखमी

Next
ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील बांद्रा शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (देवलापार ): भरधाव कारवरील मद्यधुंद चालकाचा ताबा सुटला आणि कारने पादचाऱ्यास धडक दिली. त्यानंतर ती कार दुभाजक ओलांडून कंटेनरच्या मागच्या भागावर आदळली. यात दोघांचा मृत्यू झाला असून, तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना देवलापार (ता. रामटेक) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर - जलपूर महामार्गावरील बांद्रा शिवारात शनिवारी सायंकाळी घडली.
राजकुमार मानसिंग भलावी (४५, रा. बांद्रा, ता. रामटेक) व लक्ष्मण मंगलानी (३५, रा. कामठी) अशी मृतांची तर बंटी हड्डिका (३०), प्रीतेश शर्मा (३०) व राहुल पारवानी (३०) तिघेही रा. कामठी अशी जखमींची नावे आहेत. राजकुमार भलावी हा वडांबाहून बांद्राकडे पायी येत येता. बांद्रा शिवारातील वळणावर मागून वेगात येणाऱ्या एमएच-०२/सीडब्ल्यू-१६२० क्रमांकाच्या कारने त्याला जोरदार धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
त्याला धडक देताच कारचालकाचा ताबा सुटला आणि ती कार दुभाजकावर आदळून पलीकडच्या मार्गालगत उभ्या असलेल्या आरजे-१४/जीएच-१५१० क्रमांकाच्या कंटेनरवर मागून धडकली. त्यामुळे कारमधील लक्ष्मण, बंटी, प्रीतेश व राहुल यांना गंभीर दुखापत झाली. यात लक्ष्मणचा काही वेळातच मृत्यू झाला. तिन्ही जखमींवर देवलापार येथील ग्रामीण रुग्णलयात प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना नागपूरला हलविण्यात आले. धडक एवढी जबर होती की कारचा दर्शनी भाग अक्षरश: चक्काचूर झाला. कारचालकासह अन्य तिघे दारूच्या नशेत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या प्रकरणी देवलापार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.

Web Title: Speedy car hit container: Two killed, three injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.