नागपूरच्या आकाशात दिसणार वेगवान सुखोई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 11:01 PM2019-11-06T23:01:55+5:302019-11-06T23:02:48+5:30
रविवारी १० नोव्हेंबरचा दिवस नागपूरकरांसाठी विशेष असणार आहे. या दिवशी आकाशात वायुसेनेची ताकद नागपूरकरांना अनुभवता येणार आहे. सोबतच सुखोई-३० विमानांच्या अंगावर काटे आणणाऱ्या कसरती पाहण्याची संधी नागपूरकरांना मिळणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रविवारी १० नोव्हेंबरचा दिवस नागपूरकरांसाठी विशेष असणार आहे. या दिवशी आकाशात वायुसेनेची ताकद नागपूरकरांना अनुभवता येणार आहे. सोबतच सुखोई-३० विमानांच्या अंगावर काटे आणणाऱ्या कसरती पाहण्याची संधी नागपूरकरांना मिळणार आहे.
भारतीय वायुसेनेच्या ८७ व्या स्थापना दिन आणि भारतीय वायुसेनेच्या अनुरक्षण कमान मुख्यालयाच्या ६५ व्या वर्षपूर्तीनिमित्त नागपूर एअर फेस्ट २०१९ चे आयोजन सकाळी १० वाजता वायुसेना नगरात अनुरक्षण कमान मुख्यालयाच्या परेड ग्राऊंडवर करण्यात आले आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुखोई-३० विमान आकाशात आपल्या चित्तथरारक कसरती दाखविणार आहेत. वायुसेनेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या एअर शोमध्ये सुखोई विमान सामिल होत असल्याची ही पहिली वेळ आहे. सुखोई फायटर विमान जगातील सर्वात स्मार्ट आणि गतीवान लढाऊ विमानांपैकी एक आहे. टी-५० सुखोई असो किंवा भारतीय वायुसेनेजवळ असलेले सुखोई-३० एमकेआय असो शत्रुंना नमविण्यासाठी पुरेसे आहे. सुखोईचे अत्याधुनिक मॉडेल टी-५० सुखोई स्टेल्थ तंत्रज्ञानयुक्त आहे. सुखोईचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची गती आणि शत्रुला चकमा देण्याची क्षमता आहे. या विमानाला लढाऊ विमानांच्या पाचव्या पिढीच्या रुपाने विकसीत करण्यात येत आहे. हे विमान केवळ भारत आणि रशियाजवळ आहेत.