बंदला नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:04 PM2021-02-27T16:04:51+5:302021-02-27T16:06:32+5:30
Nagpur News नागपुरात वाढत्या कोराेनाला नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाने शनिवार व रविवार या दोन दिवशी बंद पाळण्याचे आवाहन केले होते. नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात वाढत्या कोराेनाला नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाने शनिवार व रविवार या दोन दिवशी बंद पाळण्याचे आवाहन केले होते. अत्यावश्यक सेवा वगळून कार्यालयांसह विविध आस्थापने व दुकाने आदी सर्व बंद ठेवण्याचे निर्देश प्रशसनाने दिले आहेत. परंतु नागरिकांसाठी मात्र कुठलीही सक्ती करण्यात आलेली नाही. हा बंद स्वयंस्फुर्तपणे करावयाचा होता. आज पहिल्या दिवशी नागपुरातील बहुतांश भागातील परिस्थती पाहिली तर रस्त्यांवरील गर्दी मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचे दिसून आले. एकूणच नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.
शनिवारी सकाळपासूनच अत्यावश्यक सेवांची दुकाने सोडली तर इतर सर्व दुकाने बंद होती. काही अपवादात्मक ठिकाणी सकाळी हॉटेल सुरु होते. परंतु दुपार होताच तेही बंद झाले. शहरातील बर्डीतील महाल, गांधीबाग, सदर, गोकुळपेठ, सक्करदरा आदी माार्केट शनिवार व रविवारी हाऊसफुल्ल असतात. पाय ठेवायलााही जागा नसते. आज शनिवारी हे सर्व मार्केट ओस पडले होते.
शहरात कापड व्यवसाय, हार्डवेयर, इलेक्ट्रानिक, लोखंड आदी बाजार पूर्णपण बंद होते. शहरातील बहुतांश रस्ते ओस पडले होते. बहुतांश ठिकाणी बंद सारखीच परिस्थिती होती. पोलीसव मनपा अधिकारीही रस्त्यावर उतरले होते. ज्या दुकानांनाा परवानगी नाही, अशांविरुद्ध कारवाई केली जात होती. नागरिकांना मात्र कुठलीही सक्ती नव्हती.
दारुच्या दुकानाबाबत संभ्रम
दारुच्या दुकानाबाबत मात्र संभ्रम दिसून आला. शुक्रवारी पालकमंत्री यांनी स्वत: पत्रपरिषदेत दारुची दुकाने सुद्धा बंद राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु आज शनिवारी अनेक भागातील दारुची दुकाने सुरु होती. त्यामुळे गरीबांच्या चहाची टपरी बंद करण्यात आली पण दारुची दुकाने सुरू ठेवली अशी नागरिकांची ओरड होती. दारुच्या दुकानाबाबतचा संभ्रम प्रशासनाने दूर करण्याची गरज आहे.
पोलीस आयुक्तांनी घेतला आढावा
दरम्यान पाोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज सकाळी व्हेरायटी चौकात पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले.