रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:07 AM2021-07-16T04:07:12+5:302021-07-16T04:07:12+5:30

नागपूर : ‘लोकमत’च्यावतीने स्वातंत्र्यसंग्राम सेनानी व ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘लोकमत रक्ताचं नातं’ या ...

Spontaneous response to blood donation camp | रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next

नागपूर : ‘लोकमत’च्यावतीने स्वातंत्र्यसंग्राम सेनानी व ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेंतर्गत राज्यभर महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. यास गुरुवारी नागपूर जिल्ह्यातील नरखेड व वेलतूर येथे रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नागरिकांना रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. यासोबतच ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेचे कौतुकही केले. आपल्या माध्यमातून इतरांचे प्राण वाचावेत या उदात्त हेतूने नागरिक स्वयंस्फूर्तपणे या शिबिरात सहभागी होत आहेत.

....

नरखेडकरांनी जपली सामाजिक बांधिलकी

कृषी उत्पन्न बाजार समितीचा पुढाकार

काटाेल : ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यात रक्तदात्यांची मोठी साखळी तयार होत आहे. याअंतर्गत सहभागी होत गुरुवारी नरखेडकरांनी सामाजिक बांधिलकी जपत मोहिमेला अधिक बळ दिले. कृषी उत्पन्न बाजार समिती, जय बजरंगबली साहाय्यता शेतकरी गट, स्व. उल्हास शंकरराव बनकर मित्रपरिवार, शिवप्रताप ढाेलताशा पथक, नाभिक एकता मंच व दलित पॅंथर सेना यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयाेजित रक्तदान शिबिराला शहरातील तरुण रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष अभिजित गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बबनराव लोहे, उपसभापती पांडुरंग बनाईत, पं.स. सभापती नीलिमा रेवतकर, माजी उपसभापती वैभव दळवी, जि. प सदस्या दीक्षा मुलताईकर, माजी सदस्य देवका बोडखे, तहसीलदार डी. जी. जाधव, मुख्याधिकारी प्रवीण मानकर, पोलीस निरीक्षक जयपालसिंग गिरासे, योगेश कुरेकर, सुरेश शेंदरे, दीपक ढोमणे, विनायक पिंजरकर, प्रतिभा जाऊळकर, वामन खवशी, मोतीलाल खजुरीया, संदीप बालपांडे, सतीश चंदेल आदींची उपस्थिती हाेती. शिबिराच्या आयाेजनासाठी सतीश येवले, शेषराव राऊत, राधेश्याम मोहरीया, पुरूषोत्तम दातीर, अशोक कुकडे, विवेक बालपांडे, रूपमाला चरपे, शुभम गोंडाणे, मंगेश बनकर, अविनाश गजबे, योगेश निंबुरकर, स्वप्निल कामडे, महेश मोहने यांनी सहकार्य केले. लाईफ लाईन रक्तपेढीच्या चमूने रक्त संकलन केले.

Web Title: Spontaneous response to blood donation camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.