काटोल तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:07 AM2020-12-09T04:07:27+5:302020-12-09T04:07:27+5:30

उमरेड येथे निघाला मोर्चा उमरेड : उमरेड येथे केंद्र शासनाच्या कृषी विधेयकाच्या विरोधात आणि दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ...

Spontaneous response in Katol taluka | काटोल तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

काटोल तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

Next

उमरेड येथे निघाला मोर्चा

उमरेड : उमरेड येथे केंद्र शासनाच्या कृषी विधेयकाच्या विरोधात आणि दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला. आ.राजू पारवे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चात माजी नगराध्यक्ष गंगाधर रेवतकर, सुधाकर खानोरकर, मधुकर लांजेवार, सुरेश पौनीकर, जितू गिरडकर, केतन रेवतकर, गजानन झाडे, राकेश नौकरकर, रितेश राऊत, चेतन पडोळे आदींची उपस्थिती होती. तहसीलदार प्रमोद कदम यांना निवेदन सोपविण्यात आले.

भिवापुरात बंदला समिश्र प्रतिसाद

भिवापूर : नवीन कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला भिवापूर शहरात समिश्र प्रतिसाद मिळाला. भिवापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस या तिन्ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. या आंदोलनात जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती नेमावली माटे, सदस्य शंकर डडमल, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष राजू राऊत, सभापती विठ्ठल राऊत, ममता शेंडे, राहुल मेश्राम, बाळू इंगोले, किरण नागरिकर, दिलीप गुप्ता, वंदना जांभुळकर, लव जनबंधू आदी सहभागी झाले होते. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ बसपाच्या वतीने तहसीलदार अनिरुध्द कांबळे यांना निवेदन देण्यात आले. बसपाचे नेते डॉ. वसंत खवास, तालुकाध्यक्ष पुणेश्वर मोटघरे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

कन्हान येथे व्यापारी प्रतिष्ठाने बंद

कन्हान : शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ कन्हान येथे महाविकास आघाडीच्यावतीने मार्च काढण्यात आला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, माजी आमदार एस. क्यू.जमा, नरेश बर्वे, अफजल चाँद, योगेश रंगारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चंद्रशेखर भीमटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत नवीन कृषी कायदा रद्द करण्याची मागणी केली.

Web Title: Spontaneous response in Katol taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.