अहिंसा स्कूटर रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
By Admin | Published: March 30, 2015 02:26 AM2015-03-30T02:26:09+5:302015-03-30T02:26:09+5:30
जैन सेवा मंडळातर्फे महावीर जयंती महोत्सवांतर्गत रविवारी अहिंसा स्कूटर रॅलीचे आयोजन करण्यात आले.
नागपूर : जैन सेवा मंडळातर्फे महावीर जयंती महोत्सवांतर्गत रविवारी अहिंसा स्कूटर रॅलीचे आयोजन करण्यात आले. या स्कूटर रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये जैन समाजातील युवावर्गाचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. याप्रसंगी जैन सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
जैन सेवा मंडळ तसेच इतर संस्थांच्या संयुक्त विद्यमाने महावीर जयंती महोत्सवांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. रविवारी इतवारीतील शहीद चौक येथून स्कूटर रॅलीला सुरुवात झाली.
सुरेशचंद्र जैन यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवली. भगवान महावीर यांच्या जयघोषात ही रॅली शांतीनगर येथील तुलसीनगर स्थित जैन मंदिर, सूर्यनगर येथील संभवनाथ जैन मंदिर, देरासर मंदिर, महावीर नगर जैन मंदिर, नागदा जैन समाजाचे शीतलनाथ जैन मंदिर, अजितनाथ जैन मंदिर, बडकस चौक येथील मंदिर, गीता मंदिर, झाशी राणी चौक, रामदासपेठेतील सुमतिनाथ जैन मंदिर, लक्ष्मीनगरातील भगवान शांतिनाथ मंदिर, बजाज नगर, सेमिनरी हिल्स या मार्गाने सदर येथील जैन मंदिरात पोहोचली. त्यानंतर एलआयसी चौक मार्गे रॅली मेयो इस्पितळात पोहोचली. मेयो इस्पितळाच्या प्रांगणात जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.यू.बी.नावाडे यांच्या हस्ते शांती ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी मेयो इस्पितळाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश वाकोड़े, डॉ. एस.के. टी. जैन, नगरसेवक दयाशंकर तिवारी, नगरसेवक जैतुनबी पटेल, अतुल कोटेचा, पोलीस निरीक्षक संतोष खांडेकर उपस्थित होते. ‘सम्मेदशिखरजी लकी ड्रॉ’चे प्रायोजक ऋषि मोदी, विजय अमृतलाल, सुदीप गुलाबचंद जैन, प्रदीप जैन, नमन बड़कुर, कोमलचंद हजारीलाल, मालती जैन, विशेष सहयोगी विनोद कोचर, रिचा जैन, वाहन सजावटीसाठी ऋषभ काटोलकर, मनीष शास्त्री, रीता रांवका यांना सन्मानित करण्यात आले. (प्रतिनिधी)