उपराजधानीतील लोकमत महामॅरेथॉनला धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 01:16 PM2020-01-06T13:16:42+5:302020-01-06T13:20:02+5:30
‘निरोगी, सुदृढ आयुष्य जगा’ असा संदेश देणाऱ्या लोकमत महामॅरेथान: सीझन-३ चे आयोजन नागपुरात रविवार २ फेब्रुवारी २०२० रोजी होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘निरोगी, सुदृढ आयुष्य जगा’ असा संदेश देणाऱ्या लोकमत महामॅरेथान: सीझन-३ चे आयोजन नागपुरात रविवार २ फेब्रुवारी २०२० रोजी होत आहे. महामॅरेथॉननिमित्त नागपूरकरांना आनंदोत्सव साजरा करण्याची संधी मिळणार आहे. ‘प्लास्टो’ हे महामॅरेथॉनचे मुख्य प्रायोजक असून ‘नागपूर महामेट्रो’ सहप्रयोजक आहेत.
त्यामुळे लोकप्रियतेचे शिखर गाठणाऱ्या या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी अखेरचा पल्ला धावपटूंसाठी आहे. खेळाडूंना आता तात्काळ महामॅरेथॉनमध्ये आपल्या नावाची नोंदणी करणे आवश्यक असेल. १ डिसेंबर रोजी नाशिक येथे झालेल्या महामॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर औरंगाबादच्या विभागीय क्रीडा संकुलात १५ डिसेंबर रोजी झालेल्या महामॅरेथॉनमध्येही महाराष्ट्राच्या शहरी आणि ग्रामीण भागातील धावपटूंनी भरभरून प्रतिसाद दिला. कोल्हापूर येथे आज रविवारी आयोजित झालेल्या महामॅरेथॉनमध्ये कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन जोरदार पाठिंबा दर्शविला. प्रत्येक पर्वात विक्रमी धावपटूंचा सहभाग आणि बक्षिसांची मोठी रक्कम हे लोकमत महामॅरेथॉनचे वैशिष्ट्य ठरले आहे. आता तातडीने नागरिक, महिला, खेळाडू, युवक-युवतींनी नोंदणी करून सहभाग निश्चित करण्याची वेळ आली आहे. निरामय आरोग्याचा संदेश देणारी ही महामॅरेथॉन ५ कि.मी. अंतराची ‘फन रन’ (वय वर्ष १२ पेक्षा अधिक तसेच धावण्याचा छंद असणाऱ्यांसाठी), १० कि.मी.ची ‘पॉवर रन’ (१६ वर्षांहून अधिक), २१ कि.मी. (१८ वर्षांहून अधिक) असणार आहे. याशिवाय ३ कि.मी. अंतराची ‘फॅमिली रन’देखील राहील. ती सर्वांसाठी खुली असेल. या महामॅरेथॉनसाठी नाव नोंदणी सुरू झाली आहे.
जास्तीत जास्त नागरिक, खेळाडू, महिला आणि धावपटूंनी लवकरात लवकर नाव नोंदवून प्रवेश निश्चित करावा, असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.
उद्दिष्ट साध्य केल्यानंतर दिले जाणारे मेडल हे धावपटूंसाठी नेहमीच संस्मरणीय ठरते. यंदाचे मेडल हे सहभागी होणाऱ्यांसाठी तर आणखीच संस्मरणीय ठरणार आहे. विशेष म्हणजे यंदा ‘क्रॉस द लाईन’ पार करणाऱ्या धावपटूंना रंगीत असे आकर्षक मेडल देऊन गौरविण्यात येणार आहे.
ग्रुप रजिस्ट्रेशनही करता येणार
वैयक्तिक आणि ग्रुपच्या स्वरूपात सहभागी होऊ इच्छिणारेही ऑनलाईन सहभाग निश्चित करू शकतात. ग्रुप रजिस्ट्रेशनही करता येणार आहे.
सहा लाख रुपयांपर्यंतची पारितोषिके
३, ५, १० आणि २१ कि.मी. मॅरेथॉन पूर्ण करणाºया सर्व धावपटूंना मेडल देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. १० व २१ कि.मी. शर्यतीतील धावपटृूंना टायमिंग सर्टिफिकेटस्ही प्रदान करण्यात येणार आहेत.
अधिक माहितीसाठी
९९२२२०००६३,९८८१७४९३९०,
९९२२९१५०३५,९८२२४०६५६२
या क्रमांकावर संपर्क साधावा.