याेग प्रशिक्षणाला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:07 AM2021-06-17T04:07:11+5:302021-06-17T04:07:11+5:30
पारशिवनी : काेराेना महामारीच्या काळात शिक्षकांचे शारीरिक व मानसिक आराेग्य चांगले राहावे, यासाठी पारशिवनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे शिक्षकांसाठी ...
पारशिवनी : काेराेना महामारीच्या काळात शिक्षकांचे शारीरिक व मानसिक आराेग्य चांगले राहावे, यासाठी पारशिवनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे शिक्षकांसाठी ऑनलाईन याेग प्रशिक्षण सुरू असून, या प्रशिक्षणाला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रविनगर नागपूरच्या प्राचार्य हर्षलता बुराडे यांच्या प्रेरणेने व ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. नितू गावंडे यांच्या संकल्पनेतून शिक्षकांकरिता ऑनलाईन योग प्रशिक्षण १ ते २१ जून या कालावधीत आयोजित केले आहे. प्रशिक्षणाचे जिल्हा समन्वयक म्हणून व्यवसाय मार्गदर्शनाचे समुपदेशक विनोद गभणे काम पाहत असून, हे प्रशिक्षण तालुका स्तरावरून कार्यान्वित होत आहे. पंचायत समिती शिक्षण विभागाच्यावतीने ‘माझे आरोग्य माझी जबाबदारी’ यानुसार गटशिक्षणाधिकारी कैलास लोखंडे यांच्या मार्गदर्शनात तालुका समन्वयक अशांत खांडेकर यांच्या नियाेजनात तालुकास्तरीय ऑनलाईन योग प्रशिक्षण १ जूनपासून सुरू झाले आहे. योग प्रशिक्षक म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गरंडा येथील शिक्षक खुशाल कापसे हे शिक्षकांना योग, प्राणायमचे प्रशिक्षण देत आहे. सकाळी ६ ते ७ या वेळेत शिक्षकांना विविध याेगासने व प्राणायमचे प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण दिले जात आहे. २१ जूनला प्रशिक्षणाचा समाराेप हाेईल. या प्रशिक्षणात ७५ शिक्षक सहभागी झाले आहेत.
===Photopath===
160621\img-20210616-wa0002.jpg
===Caption===
योग