‘वेव्हस्’ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Published: September 26, 2014 01:17 AM2014-09-26T01:17:04+5:302014-09-26T01:17:04+5:30
विणकरांना प्रोत्साहन देऊन हातमागाची परंपरा जिवंत ठेवण्यासाठी क्रिएटिव्ह कम्युनिकेशन्स लिमिटेडतर्फे उत्तर अंबाझरी मार्गावरील नैवेद्यम सेलिब्रेशन सेंटरमध्ये २५ ते २९ सप्टेबर दरम्यान ‘वेव्हस्’
विविध राज्यांतील वैविध्यपूर्ण हातमागाची शृंखला
नागपूर : विणकरांना प्रोत्साहन देऊन हातमागाची परंपरा जिवंत ठेवण्यासाठी क्रिएटिव्ह कम्युनिकेशन्स लिमिटेडतर्फे उत्तर अंबाझरी मार्गावरील नैवेद्यम सेलिब्रेशन सेंटरमध्ये २५ ते २९ सप्टेबर दरम्यान ‘वेव्हस्’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रदर्शनाचे आयोजक सर्वेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रदर्शनात एकूण ५७ स्टॉल्स असून यात विणकरांनी तयार केलेल्या कॉटन आणि सिल्क साड्या, फॅब्रिक्स, स्टोल्स, दुपट्टा, होम फनिर्शिंग उपलब्ध आहे. भारतीय हातचरखा आपल्या गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहे. प्रदर्शनात आंध्र प्रदेशातील गुणवत्तापूर्ण साड्या आणि ड्रेस मटेरियल, वेंकटगिरी, धर्मावरम, उप्पाडाचे रेशम आणि कापसाच्या साड्या, तेलंगणा ते गढवाल, कोत्तकोट, पोचमपल्ली येथील कॉटन आणि सिल्क साड्या, छत्तीसगडचे कोसाचे कापड, गुजरातचे वनस्पती रंग आणि प्रसिद्ध कच्छ कढाई, जम्मू-काश्मीरचे प्रिंटेड शुद्ध रेशम, बारीक कपडा आणि जाळ्याच्या साड्या, नाजूक हस्त एम्ब्रॉयडरी, पश्मिना शाल, कर्नाटकच्या बॉर्डरच्या रेशमाच्या साड्या, महाराष्ट्रातील पैठणी, पश्चिम बंगालच्या काथा वर्क साड्या, परंपरागत मलबरी आणि तस्सर, इरी, मुगा यासारख्या वन रेशमाचा उपयोग करून तयार केलेल्या साड्यांचा संग्रह प्रदर्शनात आहे. याशिवाय खादी सिल्क, बेडशीट, ड्रेस मटेरियल, कश्मिरी टॉप, कुर्ती, कुर्ता उपलब्ध आहे.
ग्राहकांना होलसेल दरात कपडे खरेदी करण्याची संधी आहे. विणकर समाज बिकट अवस्थेतून वाटचाल करीत असून या कलेचे संवर्धन करण्यासाठी प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देण्याचे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे. प्रदर्शन सकाळी ११ ते रात्री ९ दरम्यान खुले असणार आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)