खेळाडूंच्या आरोग्याशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 01:54 AM2017-10-26T01:54:56+5:302017-10-26T01:55:07+5:30

तब्बल ३९ वर्षानंतर नागपूरला राज्य शालेय मैदानी स्पर्धेचे यजमानपद मिळाले. मात्र स्पर्धेच्या पहिल्या दिवशीच नको ते प्रकार घडल्याने स्पर्धेची नियोजनशून्यता चव्हाट्यावर आली आहे.

Sports with the health of players | खेळाडूंच्या आरोग्याशी खेळ

खेळाडूंच्या आरोग्याशी खेळ

Next
ठळक मुद्देराज्य अ‍ॅथ्लेटिक्स स्पर्धेत निष्कृष्ट दर्जाचे जेवण भात-भाजीमध्ये अळ्या खेळाडूंची पाण्यासाठी भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर. तब्बल ३९ वर्षानंतर नागपूरला राज्य शालेय मैदानी स्पर्धेचे यजमानपद मिळाले. मात्र स्पर्धेच्या पहिल्या दिवशीच नको ते प्रकार घडल्याने स्पर्धेची नियोजनशून्यता चव्हाट्यावर आली आहे. जेवणात किडे आणि अळ्या आढळल्याची तक्रार खेळाडूंनी केली. काही विद्यार्थिनींची छेड काढल्याचे प्रकार घडल्याची माहिती पुढे आली आहे.
राज्य शालेय स्पर्धेसाठी नऊ विभागातीन हजारावर मुली नागपुरात दाखल झाल्या आहेत. या मुलींची निवास व्यवस्था मानकापूर येथील विभागीय क्र ीडा संकुल व क्र ीडा प्रबोधिनीमध्ये करण्यात आली तर भोजनाची व्यवस्था संकुल परिसरातील वसतिगृहात आहे. सहभागी खेळाडूंना अत्यंत निकृष्ट दर्जाचे भोजन देण्यात येत असल्याची तक्र ार बुधवारी विविध विभागांमधून आलेल्या खेळाडू व शिक्षकांनी केली. क्रीड़ा उपसंचालक सुभाष रेवतकर आणि क्लर्क महेश पडोळे यांच्याकडेही तक्रार करण्यात आली. परंतु त्यांनी या तक्रारीची साधी दखलही घेतली नाही. सकाळच्या सुमारास काही विद्यार्थिनी जेवण करीत असताना भात व भाजीमध्ये अळ्या आढळून आल्या. यासंदर्भात विद्यार्थिनींनी आपापल्या विभागाच्या शिक्षकांना माहिती दिली. शिक्षकांनी कॅटर्स मालकाला चूक निदर्शनास आणून दिल्यानंतर त्याने अरेरावीची भाषा वापरल्याचाही आरोप शिक्षकांनी केला. भात, भाजीसोबतच पोळ्या देखील निकृष्ट दर्जाच्या असल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले.
अंथरायला गादी, पांघरायला काहीच नाही
मंगळवारी रात्री प्रत्येक खेळाडूला अंथरायला गादी देण्यात आली. परंतु पांघरायला काहीच न दिल्याने त्यांना थंडीत रात्र काढावी लागली. निवासाची व्यवस्था करण्यात आलेल्या होस्टलमध्ये ना वीज होती ना पंखे. या खेळाडूंना डासांनी रात्रभर छळले.
विद्यार्थिनीची छेडखानी, पोलीसही पोहोचले
बुधवारी सकाळीच स्पर्धांना सुरुवात होणार असल्याने बरेच संघ मंगळवारी नागपुरात दाखल झाले. रात्री जेवण करून झोपी गेल्यानंतर एका विद्यार्थिनीसोबत छेडखानी केल्याचा आरोप करण्यात आला. क्र ीडा संकुल परिसरात स्पर्धेदरम्यान कामासाठी बोलाविण्यात आलेल्या एका तरु णाने विद्यार्थिनीची छेड काढल्याची चर्चा सर्वत्र पसरली. संबंधित प्रकाराची चौकशी करण्यासाठी सकाळी पोलिसांनाही घटनास्थळी बोलविण्यात आले होते. पोलिसांसमक्ष या विद्यार्थिनींनी असे काही घडलेच नाही, असे सांगताच तक्रार दाखल न करता पोलीस निघून गेले.
चादर गुंडाळून बनवले टॉयलेट
अ‍ॅथ्लेटिक्सच्या सिंथेटिक मैदानात एक हजार महिला खेळाडूंसाठी १० बाय १० फुटांचे टॉयलेट चक्क चादर गुंडाळून बनविण्यात आले. महानगर पालिकेचा एक दुर्गंधीयुक्त मोबाईल टॉयलेट अशा ठिकाणी उभा करण्यात आला जिथे दिवसभरात एकही खेळाडू पोहचू शकला नाही. पिण्याच्या पाण्याचीही स्थिती अशीच होती.
शौचालयाच्या कुंडया गायब
शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, विभागीय क्रीड़ा संकुलच्या होस्टलमध्ये प्रत्येक माळयावर चार टॉयलेट आहेत. परंतु येथे नुसती घाण साचली आहे. वॉश बेसिन कडे तर पाहावलेही जात नाही. शौचालयाच्या कुंडया गायब आहेत. महिला खेळाडू टॉयलेटला गेली तर तिच्या सहकारी खेळाडूला सुरक्षेसाठी बाहेर उभे राहावे लागते.

विद्यार्थिनींच्या निवासाची व्यवस्था करण्यात आलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. रात्री विद्यार्थिनीसोबत झालेल्या प्रकाराच्या चौकशीसाठी सकाळी पोलिसांना बोलाविण्यात आले. त्यांना सीसीटीव्ही फुटेजही दाखविण्यात आले. मात्र या प्रकारामुळे काहींनी आपले बिंग फुटण्याच्या भीतीने कोणतीही तक्र ार दाखल केली नाही. स्पर्धेच्या निमित्ताने आलेल्या काही शिक्षकांना चाळे करताना रंगेहात पकडण्यात आल्याने हे सर्व नाट्य रचण्यात आले. जेवणासाठी १५० रुपये प्रती विद्यार्थी मंजूर झाले आहेत. त्यात सकाळचा नाश्ता आणि दोनवेळचे जेवण देण्यात येत आहे. जेवणाचे कंत्राट देखील निविदाद्वारे देण्यात आले आहेत.
सुभाष रेवतकर, विभागीय क्र ीडा उपसंचालक, नागपूर.

Web Title: Sports with the health of players

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.