गर्दीच्या ठिकाणी ऑन द स्पॉट ॲन्टिजेन टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:08 AM2021-03-23T04:08:06+5:302021-03-23T04:08:06+5:30

नागपूर : नागपुरात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आता गर्दीच्या ठिकाणी ऑन द स्पॉट ॲन्टिजेन टेस्ट करण्यात येणार आहे. पालकमंत्र्यांनी ...

On-the-spot antigen test in crowded places | गर्दीच्या ठिकाणी ऑन द स्पॉट ॲन्टिजेन टेस्ट

गर्दीच्या ठिकाणी ऑन द स्पॉट ॲन्टिजेन टेस्ट

googlenewsNext

नागपूर : नागपुरात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आता गर्दीच्या ठिकाणी ऑन द स्पॉट ॲन्टिजेन टेस्ट करण्यात येणार आहे.

पालकमंत्र्यांनी काल रविवारी कोरोनासंदर्भात बैठक घेतली होती. त्यात नागपुरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते. यासाठी काही सूचनाही केल्या होत्या. नागपूर शहरातील धरमपेठ, लक्ष्मीनगर, हनुमाननगर या उच्चभ्रू वस्तींमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असेल तर त्याचे नेमके कारण काय आहे? याचा शोध घेऊन या ठिकाणी ॲन्टिजेन टेस्टसारख्या पर्यायातून चाचणी सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार प्रशासनाने कृती आराखडा तयार केला असून, गर्दीच्या ठिकाणी ऑन द स्पॉट ॲन्टिजेन टेस्ट करण्यात येईल. तसेच शहरातील हॉटस्पॉट झालेल्या भागावर विशेष लक्षसुद्धा ठेवण्यात येणार आहे.

Web Title: On-the-spot antigen test in crowded places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.